शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे शहरात, ‘औरंगाबाद व्हिजन’वर आज परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:50 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बुधवारी सायंकाळी शहरात आगमन झाले. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी ‘औरंगाबाद व्हिजन’वर परिसंवाद होणार असून ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बुधवारी सायंकाळी शहरात आगमन झाले. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी ‘औरंगाबाद व्हिजन’वर परिसंवाद होणार असून ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुंबईहून सायंकाळी ५.३० वाजता चिकलठाणा विमानतळावर राज ठाकरे यांचे आगमन झाले. त्यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, मनविसे जिल्हाध्यक्ष अमोल खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. विमानतळापासून जालना रोडवरील हॉटेलपर्यंत वाहन रॅली काढण्यात आली. राज ठाकरे यांनी सायंकाळी पदाधिकाºयांची बैठक घेऊन संवाद साधला.महिनाभरात दुसºयांदा ते मराठवाड्याच्या दौºयावर आले असून, गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता पक्ष प्रवेश सोहळा, पदाधिकारी बैठक, नवीन नियुक्त्या आदी कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता शहरातील एका हॉटेलमध्ये ‘औरंगाबाद व्हिजन’ हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील २०० लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे.शहरात १९ जुलै रोजी झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधानांवर टीका केली होती. कचºयाच्या प्रश्नावरून त्यांनी औरंगाबाद महापालिकेचाही चांगलाच समाचार घेतला होता. औरंगाबादेत ज्यांच्या हातात २५ ते ३० वर्षे सत्ता दिली, त्यांच्याकडून कचºयाचे नियोजन झाले नाही. शहर वाढण्याऐवजी बकाल होत आहे. महापालिका खाऊन फक्त रिकामी करण्यासाठी नाही, अशी टीका त्यांनी केली होती.मनसेचे औरंगाबाद लक्ष्यशिवसेनेतील गटबाजी आणि अपमानास्पद वागणुकीमुळे काही जण मनसेकडे आकर्षित झाल्याचे कळते. यामध्ये काही माजी नगरसेवक, पदाधिकारी मनसेमध्ये जाण्याच्या वाटेवर आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांचे ‘व्हिजन औरंगाबाद’च्या माध्यमातून येथील राजकारण ताब्यात घेण्याचे नियोजन असल्याचे समजते. त्यामुळे गेल्या महिनाभरात दुसºयांदा ते औरंगाबादेत दाखल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे