शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
3
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
4
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
5
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
6
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
7
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
8
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
9
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
10
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
11
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
12
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
13
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
14
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
15
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
16
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
17
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
18
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
19
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
20
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या हालचाली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 19:11 IST

शासनाकडे काही हवामानतज्ज्ञांनी प्रयोगासाठी रेटा लावण्यास सुरुवात केली आहे. 

ठळक मुद्दे २०१५ व २०१७ मध्ये फसला होता प्रयोगपश्चिम किनारा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा भागात कमी पाऊस होण्याची शक्यता

- विकास राऊत 

औरंगाबाद : महाराष्ट्रात यावर्षी कमी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज सॅसकॉफ (साऊथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरम) ने व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने यंदा राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती हाती आली आहे. २०१५ मध्ये औरंगाबाद आणि २०१७ मध्ये सोलापूर येथून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे प्रयत्न झाले. मात्र, ते फसले असून, यावेळी शासनाकडे काही हवामानतज्ज्ञांनी प्रयोगासाठी रेटा लावण्यास सुरुवात केली आहे. 

सॅसकॉफची काठमांडू येथे परिषद झाली. त्या परिषदेतील हवामानतज्ज्ञांच्या चर्चेनुसार राज्यातील पश्चिम किनारा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा भागात कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. या परिषदेच्या हवाल्यानुसार राज्यात कृत्रिम पावसाची गरज असल्याचे काही हवामानतज्ज्ञ बोलू लागले आहेत. २०१५ मध्ये औरंगाबाद येथे १०० तासांवर १०० तास मोफत अशा स्कीमवर ख्याती वेदर मॉडिफिकेशन या संस्थेला प्रयोगाकरिता २७ कोटी रुपयांचे कंत्राट दिले गेले होते. औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले होते. ४५० कि़मी.च्या अंतरात पूर्ण राज्यात येथून प्रयोगासाठी विमानाने उड्डाण घेतले; परंतु त्यातून काही साध्य झाले नाही. औरंगाबादमध्ये कृत्रिम पावसाचा केलेला प्रयोग फसला तरीही २०१७ मध्ये सोलापूर येथून प्रयोगासाठी प्रयत्न झाले. 

औरंगाबादेतील प्रयोगासाठी ३ हजार सिल्वर आयोडाईड, सिल्वर कोटेड नळकांडे (सिलिंडर) कोट्यवधी रुपयांतून खरेदी केले. ते सिलिंडर विमानतळावर ठेवल्याचे सांगण्यात आले. केवळ ५०० सिलिंडर वापरले, उर्वरित २५०० सिलिंडर उंदरांनी खाल्ले, की ख्याती वेदर मॉडिफिकेशन या कंपनीने परत नेले की, यंत्रणेने विकले, याची काहीही माहिती प्रशासनाकडे नाही. २०१५ मध्ये मराठवाड्यात केलेल्या प्रयोगातून जवळपास २०० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद कंपनीने केली होती; परंतु प्रत्यक्षात तेवढा पाऊस झालाच नाही.

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे दुष्परिणाम कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे पाऊस न झाल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. प्रयोगात वापरले जाणारे सिल्वर आयोडाईड हे रसायन विषारी असल्याने पर्यावरण आणि सस्तन प्राण्यांसाठी घातक आहे. या कारणास्तव आॅस्ट्रेलियामध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर बंदी आहे. विमानाने कृत्रिम पावसाचा प्रयोग मान्सूनपूर्व आणि मान्सुनोतर काळात करणे अतिशय धोकादायक असल्याचे मत हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केले.

संचालकांनी बोलणे टाळले राज्य आपत्कालीन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, याबाबत माझ्याकडे काहीही माहिती नाही, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निरीक्षक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. त्यामुळे सध्या या विषयावर काहीही बोलणे शक्य नाही. तसेच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, याबाबत शासन स्तरावर निर्णय होईल, आयुक्तालयाकडे अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. 

टॅग्स :RainपाऊसState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा