शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

थरारक ! आवडत्या मुलीचे लग्न ठरले, संतापून तरुणाने भावी नवरदेवाच्या हॉटेलवर केला गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 16:11 IST

Firing at Pagegaon पडेगांव येथील रामगोपालनगरातील रात्री ३ वाजेची घटना

ठळक मुद्दे'..त्या मुलीसोबत लग्न करू नको'  गोळीबार करून फेकली धमकीची पत्रे 

औरंगाबाद: आपल्याला नाकारणाऱ्या मुलीसोबत तुम्ही लग्न करू नका, यासाठी चक्क नियोजित नवरदेवाच्या घरात धमकीचे पत्र टाकून दोन जणांनी हॉटेलवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पडेगांवातील रामगोपालनगरात घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली. 

विशाल मनोहर गाडीलकर (रा. कोपर्डी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे संशयिताचे नाव आहे. यावेळी त्याच्यासोबत अन्य एक जण होता. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार मनिष किसनराव गायकवाड या तरुणाचे पडेगांव येथे हॉटेल मनिष इन हे हॉटेल आणि लॉजिंग आहे. या हॉटेलच्या मागे तो आईवडिल आणि बहिण यांच्यासोबत राहतो. मनिषचे दोन महिन्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील मुलीसोबत लग्न ठरले आहे. २५ एप्रिल रोजी त्यांचा विवाह होणार आहे. मनिषचे लग्न जमण्यापूर्वी संशयित आरोपी विशालने त्या तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तिच्या आईवडिलांनी त्यास नकार दिला होता. 

दरम्यान, तीचे मनिषसोबत लग्न जमल्याची माहिती मिळताच विशाल आणि त्याच्या नातेवाईकांनी आपल्याला नाकारणाऱ्या मुलीच्या कुटुंबासोबत तुम्ही सोयरीक करु नका असा आग्रह गायकवाड कुटुंबाकडे धरला. मात्र, गायकवाड कुटुंबीयांनी त्यास नकार देत लग्नाची तारीख काढली. यानंतर विशालने मनीषच्या वडिलांना व्हॉटसॲपवर, 'त्या मुलीचा विचार सोडा' असा मेसेज केला. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून गायकवाड कुटुंबाने लग्नाची तयारी सुरु केली.

३० मार्च रोजी रात्री १० वाजता नेहमीप्रमाणे गायकवाड कुटुंब झोपले.  रात्रपाळीचा हॉटेलचा मॅनेजर शेख मुजफ्फर स्वागत कक्षातील सोफ्यावर  झोपला होता. पहाटे ३ वाजेच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने तो झोपेतून उठला. यावेळी त्याच्या ब्लॅंकेटवर काचा पडलेल्या दिसल्या. शिवाय स्वागत कक्षाच्या काचेवर छिद्र पडलेले आणि काचेला तडे गेल्याचे दिसले. कोणीतरी दगड मारला असेल असे समजून त्याने शेजारीच राहणाऱ्या मनिषला आवाज देऊन उठवले.

पोलीस आयुक्तासह अन्य अधिकारी घटनास्थळीया घटनेची माहिती मनिष यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहाय्यक आयुक्त विवेक सराफ, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, मनोज पगारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन वायाळ, पी. एस. भागिले आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद