शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

थरार ! एटीएममध्ये फेरफारकरून पैसे काढणाऱ्या यूपीच्या टोळीला पोलिसांनी पाठलाग करून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 13:02 IST

gang of UP money launderers arrested : गेल्या काही दिवसांपासून शहरातील काही एटीएम सेंटरमधून अनधिकृत व्यवहार होत असल्याची माहिती एटीएम संचलन करणाऱ्या कंपनीच्या आयटी सेलला समजली होती.

ठळक मुद्देटोळीने शहरातील दहा ते बारा एटीएममधून पैसे पळविल्याची प्राथमिक माहितीपळणाऱ्या तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले, त्यांचे दोन साथीदार अंधारात पळून गेले.

औरंगाबाद : एटीएममध्ये कार्डऐवजी काहीतरी वस्तू टाकून पैसे काढणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीला एसबीआय बँकेच्या आयटी सेलच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी पाठलाग करून पकडले. परंतु, दोन आरोपी कार सोडून पळून गेले. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (  Police chased and caught a gang of UP money launderers by tampering with ATMs) 

रोहितसिंग विजय बहादुरसिंग (वय २९, रा. चारपुरा, ता. लालगंज, जि. प्रतापगड), संजयकुमार शंकरलाल पाल (२१, रा. मनोहरपूर, ता. सौरव, जि. प्रयागराज), अंकुश बढेलाल मोर्या (२१, रा. हरवीपूर, सांजा, उत्तर प्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार अलोकपाल आणि भैया हे दोन आरोपी मात्र पळून गेले. त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील काही एटीएम सेंटरमधून अनधिकृत व्यवहार होत असल्याची माहिती एटीएम संचलन करणाऱ्या कंपनीच्या आयटी सेलला समजली होती. यामुळे आयटी सेल शहरातील एटीएमच्या व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवून होते. मंगळवारी रात्री ११.३५ वाजण्याच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील एसबीआयच्या एटीएम सेंटरमध्ये असा व्यवहार होत असल्याचे समजताच मुंबईतील आय टी सेलने एसबीआय बँकेचे एटीएम संचलन करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना कळविले. हा प्रकार अधिकाऱ्यांनी मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे यांना आणि कंपनीचे कर्मचारी आशिष खंडागळे आणि आशिष चव्हाण यांना सांगितला. त्याच परिसरात असलेल्या खंडागळे, चव्हाण यांनी तेथे धाव घेताच आरोपींनी त्यांच्या कारमधून धूत हॉस्पिटलसमोरून ब्रीजवाडीच्या दिशेने पळ काढला. 

पोलीस निरीक्षक इंगळे यांनी साथीदारांसह त्यांचा पाठलाग सुरू केला तेव्हा, आरोपींनी कार थांबविली आणि ते पळू लागले. पळणाऱ्या तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यांचे दोन साथीदार अंधारात पळून गेले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एटीएमची पाहणी केली असता एटीएमच्या कॅशचे शटर चकटलेले दिसले. आरोपींनी २० हजार रुपये काढण्याची कमांड एटीएमला दिली होती. यापैकी १३ हजार रुपये त्यांनी घेतले. उर्वरित सात हजार रुपये मशीनमध्ये अडकल्याचे दिसून आले. याप्रकरणी अभिजित सतीश निकुंभ यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. आरोपींनी शहरातील दहा ते बारा एटीएममधून पैसे काढल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय त्यांनी अन्य शहरात आणि राज्यातही अशा प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीatmएटीएमAurangabadऔरंगाबाद