शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंतापूर शिवारात मध्यरात्री थरार; सशस्त्र दरोडेखोरांवर पोलिसांचा गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:45 IST

पाठलाग करून एका दरोडेखोरास पकडण्यास पोलिसांना यश

ठळक मुद्देदरोडेखोरांनी पोलिसांवर केली दगडफेकपोलीस निरीक्षक जखमी

गंगापूर : तालुक्यातील अहमदनगर पुणे मार्गावरील अंतापूर शिवारात दरोडेखोर व पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आल्याने दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून एका दरोडेखोराला पकडले असून दोन दुचाकी आणि शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.

शुक्रवार मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला गंगापूर शहरात पोलिसांकडून मिडनाईट मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते  हा कार्यक्रम संपल्यावर पोलीस कर्मचारी व अधिकारी कार्यक्रमाची चर्चा करत असतानाच पोलीस निरीक्षक सुरवसे यांना अंतापूर शिवारात दोन दुचाकीवरून पाच ते सहा जण दरोड्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. सुरवसे यांनी  वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ  सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर, रामहरी चाटे, पोलीस कर्मचारी जितेंद्र बोरसे, विजय भिल, भागचंद कासदे ,बंडू कुचेकर, दत्तात्रय गुंजाळ, चालक शेख रिजवान यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. पोलिस आल्याची चाहूल लागताच दरोडेखोरांनी दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या दुचाकी घसरल्याने ते खाली पडले. यानंतर अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी तेथून पलायन केले. 

पोलिसांनी पाठलाग करताच त्यांनी दगडफेक सुरु केली. यात पो.नि. सुरवसे जखमी झाले. हल्ला वाढत असल्याने सुरवसे यांनी सर्व्हिस पिस्टल मधून दोन राऊंड हवेत फायर केले. गोळीबार होताच दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत यातील एकाला ताब्यात घेतले आहे. यावेळी दोन दुचाकी आणि काही शस्त्रेसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. दरम्यान, तीन दरोडेखोर हे अहमदनगर जिल्ह्यातील तर दोघे वाळूज परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. कारवाईत जखमी झालेले पो.नि.सुरवसे यांच्यावर शहरातील  उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार  करण्यात आले.

टॅग्स :RobberyचोरीAurangabadऔरंगाबादArrestअटकPoliceपोलिस