येणेगूर (जि. धाराशिव) : गावानजीक वेगाने दुचाकी हळू चालव, असा सल्ला देणारा व्यक्ती आणि साथीदारांवर चाकू व हातातील कड्याने मारहाण झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी येथील महामार्गावरील मरीराई चौकात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध मुरुम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चंद्रशेखर कल्याणी माळी आणि विकास मधुकर गाडेकर हे दोघे दुचाकीवरून महाराष्ट्र बँकेकडून येणेगूर गावात सेवा रस्त्यावरून येत होते. यावेळी अंडरपास पुलाखालून येत सताना शंकर विलास कवठे व सुहास विल्यम कवठे हे दोघे बंधू दुचाकीवरून वेगाने माळी यांच्या दुचाकीसमोर आले. यावर चंद्रशेखर माळी यांनी गाडी हळू चालव, असे त्यांना सांगितले असता, शंकर कवठे व सुहास कवठे यांनी ‘आम्हाला गाडी हळू चालव, म्हणून सांगणारा तू कोण’ असे म्हणून वाद सुरू केला.
यावेळी भरात शंकर कवठे, विलास कवठे, मागील दुसऱ्या दुचाकीवरील विठ्ठल महादेव दासमे व अंकुश फुलचंद जमादार (सर्व रा.नळवाडी) यांनी चंद्रशेखर माळी यांना हातातील कपड्याने तर विकास गाडेकर याच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर चाकूचा वार करून जखमी केले.या प्रकरणी मुरुम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, तपास सहायक पोलिस फौजदार संजीवन शिंदे करीत आहेत.