शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद देणार राज्याला नव्या २६१ ‘लाल परी’; पहिल्या बसचा मान नाशिकला

By संतोष हिरेमठ | Updated: January 4, 2023 23:54 IST

औरंगाबादकर थोडं थांबा, पहिल्या ‘लाल परी’चा मान नाशिकला

औरंगाबाद : तब्बल तीन वर्षांनंतर तयार झालेल्या औरंगाबादेतीलएसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील पहिली बस मिळविण्याची शर्यत नाशिक विभागाने जिंकली. ही पहिली बस मिळविण्यासाठी औरंगाबाद विभागाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. नव्या बससाठी औरंगाबादकरांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे.

चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गेल्या तीन वर्षांपासून नवीन चेसीस नसल्याने नव्या बसगाड्यांची निर्मिती पूर्णपणे थांबलेली होती. त्यामुळे केवळ जुन्या लाल बसच्या चेसीसवर स्टील बाॅडीची बस बांधणी केली जात होती. एसटी प्रवाशांना नवीन बस मिळणेच बंद झाले होते. अखेर ऑक्टोबरमध्ये कार्यशाळेला पुन्हा एकदा नव्या चेसीस मिळण्यास सुरुवात झाली. मार्चपर्यंत नव्या चेसीसवर २६१ बस बांधण्यात येणार आहेत. या बसेस राज्यभरात पाठविण्यात येणार आहे. पहिली बस तयार झाली असून गुरुवारी नाशिकला रवाना होणार असल्याची माहिती चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा व्यवस्थापक प्रमोद जगताप यांनी दिली.

कशी आहे नवीन बस?नवीन बस ही ११ मीटर लांबीची आहे. आसनाची संख्या ४४ आहे. नव्या बसमधील पाठीमागील जागेत पाट्याऐवजी एअर सस्पेन्शन आहे. त्यामुळे बस खड्ड्यांमधून जाताना प्रवाशांना फारसा त्रास होणार नाही. जुन्या साध्या बसचा दरवाजा हा पुढील चाकाच्या पाठीमागे आहे, परंतु नव्या बसचा दरवाजा हा चाकाच्या पुढे आहे. नव्या बसच्या दरवाजाचा बहुतांश भाग काचेचा आहे.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबाद