लोहा : सन २०१०-११ मध्ये शासनामार्फत दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना रमाई घरकुल आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले़ मात्र जवळपास तीन वर्षे उलटून देखील घरकुल पात्र लाभार्थ्यांना बांधकामासाठी ऩ प़ कडून परवानगी मिळाली नसल्यामुळे संतप्त पात्र लाभार्थी काँग्रेस नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली ऩ प़ कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे़अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी व दारिद्रय रेषेअंतर्गत कुटुंबासाठी त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनामार्फत उदात्त हेतूने रमाई घरकुल आवास योजना कार्यान्वित करण्यात आली़ त्या अंतर्गत लोहा ऩ प़ क्षेत्रात सदरील योजना सन २०१०-११ मध्ये राबविण्यात आली़ त्यामध्ये शेकडो घरकुल ऩ प़ च्या वतीने मंजूर करण्यात आले़ मात्र पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होवून जवळपास तीन वर्षाचा कालावधी उलटून देखील काही मंजूर लाभार्थींना अद्याप ऩ प़ च्या बांधकाम विभागाकडून बांधकाम करण्यास परवानगी मिळाली नसल्यामुळे नगर परिषदेच्या तुघलकी कारभाराविरोधात ऩ प़ चे बांधकाम सभापती पंकज परिहार, नगरसेवक शंकर पाटील कऱ्हाळे, रिपाइंचे बबन निर्मले यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थी १९ आॅगस्टपासून आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.(वार्ताहर)
तीन वर्ष झाली, लाभार्थ्यांना घरकुलाची परवानगी मिळेना
By admin | Updated: August 9, 2014 00:39 IST