शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

खवल्या मांजराची तस्करी करणारे तिघे वन विभागाच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 17:02 IST

सोयगाव तालुक्यातील देव्हारी येथील तिघांनी तस्करीच्यासाठी दुर्मिळ प्रजातीचे खवले मांजर पकडले होते.

ठळक मुद्देअजिंठा वन विभागाची कारवाई

सोयगाव : राखीव जंगलातील खवल्या मांजराला पकडून तस्करी करणाऱ्या तिघांना अजिंठा वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. वनविभागाच्या पथकाने सावळदबारा (ता.सोयगाव) परिसरात गुरुवार(दि.१२) रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. आरोपींमध्ये एका १६ वर्षीय विधीसंघर्ष बालकाचा समावेश आहे.

या बाबत वनविभागाकडून प्राप्त माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील देव्हारी येथील तिघांनी तस्करीच्या उद्देशाने अत्यंत दुर्मिळ प्रजातीचे खवले मांजर पकडले असल्याची माहिती अजिंठा वनविभागा मिळाली. यावरून वनपरीक्षेत्राच्या पथकाने बनावट ग्राहक तस्कारांकडे पाठवला. आरोपींनी बनावट ग्राहकासोबत ६ लाख ५० हजार रुपयांमध्ये खवले मांजर खरेदीचा सौदा पक्का केला. ५ हजार रुपये आगाऊ घेऊन आरोपींनी गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उर्वरित रक्कम घेऊन सावळदबारा परीसरात बोलावले. दरम्यान, अजिंठा वनपरीक्षेत्र विभागाच्या पथकाने सावळदबारातील त्यात जागेत सापळा लावला. खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या तिघांना नसीर खा लाडखा तडवी (वय २४) अमिर समशेद खा तडवी (वय १८) व एक सोळावर्षीय विधिसंघर्ष बालक (तिघे रा.देव्हारी ता.सोयगाव) यांना विक्रीसाठी आणलेल्या खवल्या मांजरासह ताब्यात घेतले. 

विशेष म्हणजे, सुमारे तीन महिन्यांपूर्वीचा खवले मांजर तस्करी प्रकरणात अनाड (ता.सिल्लोड) परिसरात सिल्लोड वनविभागाच्या पथकाने तिघांना अटक केली होती. त्यानंतर आता सोयगाव तालुक्यात तिघांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. वाढत्या तस्करीमुळे अजिंठा राखीव जंगलातील खवल्या मांजरांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादforestजंगल