शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

‘एमआरआय’साठी तीन महिन्यांची ‘वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:05 AM

औरंगाबाद : घाटीत ‘एमआरआय’ तपासणीसाठी रुग्णांना तब्बल तीन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. एकीकडे रुग्णांचा भार वाढला आहे, तर ...

ठळक मुद्देघाटी रुग्णालय : तपासणीसाठी रुग्णांना आॅगस्ट महिन्यातील तारीख

औरंगाबाद : घाटीत ‘एमआरआय’ तपासणीसाठी रुग्णांना तब्बल तीन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. एकीकडे रुग्णांचा भार वाढला आहे, तर दुसरीकडे सध्याचे यंत्र जुनाट झाले आहे. मोजक्या रुग्णांचीच तपासणी त्याद्वारे करता येते. नव्या यंत्राचीही प्रतीक्षाच करावी लागत असल्याने गोरगरीब रुग्णांना यातना सहन कराव्या लागत आहेत.घाटी रुग्णालयात सध्या दररोज १५ रुग्णांची एमआरआय तपासणी केली जाते. सध्याच्या एमआरआय मशीनचे आयुष्य संपलेले आहे. कोणत्याही क्षणी हे यंत्र बंद पडू शकते. हे यंत्र वारंवार गरम होते. त्यामुळे दिवसभरात थांबत-थांबत रुग्णांची तपासणी केली जात आहे. या सगळ्यांमुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस वाढत आहे.घाटीतील एमआरआय मशीन जुनाट झाल्याने नव्या यंत्रासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. घाटीने गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात एमआरआय मशीनसाठी शिर्डी संस्थानला साकडे घातले होते. त्यानंतर घाटी रुग्णालयाला शिर्डी संस्थान पावले आणि एमआरआय मशीनसाठी १५ कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. निधी उपलब्ध झाला. मात्र अद्यापही नव्या यंत्राची प्रतीक्षाच करावी लागत आहे. यंत्राची खरेदी प्रक्रिया सुरू असून, लवकरच ते उपलब्ध होईल, असे घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.गोरगरिबांना आर्थिक फटकाघाटीत दररोज अवघ्या १५ रुग्णांची तपासणी होते. उर्वरित रुग्णांना तारीख दिली जाते. त्यामुळे नाइलाजाने अनेकांना घाटीबाहेरचा रस्ता धरावा लागत आहे. त्यातून आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ गोरगरीब रुग्णांवर येत आहे. ही परिस्थिती दूर करण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे.अत्यावश्यक रुग्णांना तात्काळघाटीत आलेल्या अत्यावश्यक रुग्णांची तात्काळ एमआरआय तपासणी केली जाते. तपासणीमुळे उपचारात फरक पडणाऱ्या रुग्णांना प्राधान्यक्रम दिला जातो. इतरांना तारीख दिली जाते. त्यामुळे प्रतीक्षा करावी लागते.- डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य