शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दीड तासाच्या विमान प्रवासासाठी तीन तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:49 IST

मुसळधार पावसामुळे मंगळवारी मुंबईत हवाई वाहतूक विस्कळीत झाली. त्यात स्पाईस जेटचे विमान घसरल्याने मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. बुधवारीदेखील दीड तासाच्या प्रवासासाठी एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाच्या प्रवाशांना जवळपास तीन तास वाट पाहावी लागली.

ठळक मुद्देमुंबई-औरंगाबाद विमान : दुसऱ्या दिवशीही विलंब, मुंबईतील पावसाचा परिणाम

औरंगाबाद : मुसळधार पावसामुळे मंगळवारी मुंबईत हवाई वाहतूक विस्कळीत झाली. त्यात स्पाईस जेटचे विमान घसरल्याने मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. बुधवारीदेखील दीड तासाच्या प्रवासासाठी एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाच्या प्रवाशांना जवळपास तीन तास वाट पाहावी लागली.एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद विमान दुपारी ३.२५ वा. उड्डाण करते. हे विमान औरंगाबादला सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास येते. या ठिकाणाहून हे विमान सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण घेते. सायंकाळी ७.१० वाजता हे विमान दिल्लीत पोहोचत असते.मुंबईत स्पाईस जेटचे विमान घसरल्याच्या घटनेनंतर मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली. पर्यायी धावपट्टीवर विमाने उतरविण्यात आली. काही आंतरराष्ट्रीय विमानांचा मार्ग बदलण्यात आला. या विमानांना बंगळुरू, अहमदाबादसह अन्य विमानतळांवर उतरविण्यात आले. हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईहून औरंगाबादला येणाºया विमानाला सलग दुसºया दिवशीही विलंब झाला.विमान प्रवासासाठी प्रवाशांना उड्डाणाच्या एक तास आधी येऊन आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. दुपारी ३.२५ ऐवजी सायंकाळी ६ वाजता मुंबई-औरंगाबाद-दिल्ली विमान उड्डाण करणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. मुंबईतील पावसाच्या परिणामामुळे विमानाला विलंब झाल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली.दोन रेल्वे रद्दमुंबईतील पावसामुळे बुधवारी मुंबईला जाणारी नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस आणि सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईला जाण्याचे नियोजन केलेल्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळRainपाऊस