लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विविध ठिकाणी गंभीर गुन्हे करुन फरार असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़ जिल्ह्यातील हिस्ट्रीशीटर व फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी दिले होते़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना केली होती़ मुदखेड पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा नोंद असलेला आरोपी १४ वर्षांपासून फरार होता़ त्यास नांदेडातील पंकजनगर भागातून सहायक पोलीस उपनिरीक्षक एस़ व्ही़ गलांडे, पोहेकॉ़ शेषेराव शिंदे, शंकर केंद्रे, संजय पांढरे, तानाजी मुळके, कानगुले यांनी ताब्यात घेतले़ नायगाव तालुक्यातील गडगा येथील एकाविरुद्ध किनवट ठाण्यात गुन्हा नोंद होता़ गत १२ वर्षांपासून सदरील आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता़ त्यास परभणी जिल्ह्यातील त्रिधारा परिसरातील आखाड्यावरुन पोलिसांनी अटक केली़ तसेच कुंडलवाडी ठाण्यांतर्गत ११ वर्षांपासून फरार आरोपीस बिलोली येथून पथकाने अटक केली़
स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या ३ फरार आरोपींना बेड्या
By admin | Updated: June 9, 2017 00:47 IST