लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील एका वॉर्डातील खोलीची स्वच्छता करताना तीन सफाई महिला कामगारांना इन्फेक्शन झाले़ त्यामुळे त्यांच्यावर दोन दिवस उपचार करुन शनिवारी सुटी देण्यात आली आहे़शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाची स्वच्छता करण्यासाठी कंत्राटी कामगार आहेत़ रुग्णालयातील वॉर्ड क्रं़ ८ मधील एक खोली गेल्या काही वर्षांपासून बंद होती़ त्यामुळे खोली उंदीर, घुशींनी उखरली होती़ तसेच तेथील गाद्याही कुरतडल्या होत्या़ दरम्यान, गुरुवारी नसिमा शेख, रेहाना शेख, हालिमा पठाण (सर्वजण रा़ लातूर) या तीन महिला कामगारांनी ही खोली उघडून स्वच्छता करण्यास सुरुवात केली़ तेथील गाद्या उचलल्या़ बंद खोलीतील दुर्गंधीमुळे आणि गाद्या उचलल्याने या तिन्ही महिला कामगारांना मळमळ होऊन चक्कर येण्यास सुरुवात झाली़ तसेच अंग खाजवूही लागले़ त्यामुळे या तिघीनांही तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर दोन दिवस करुन शनिवारी सकाळी तीनही महिला कामगारांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे़
तीन सफाई कर्मचाऱ्यांना ‘सर्वोपचार’मध्येच इन्फेक्शन
By admin | Updated: January 28, 2017 23:42 IST