शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीवर अत्याचार करीत व्हिडीओ व्हारयल करण्याची धमकी

By राम शिनगारे | Updated: April 14, 2024 21:16 IST

सराईत गुन्हेगाराचे कृत्य : बलात्कारासह ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : दोन दिवसापूर्वी पोलिसांनी नशेच्या औषधांचा साठा जप्त केलेल्या सराईत गुन्हेगाराने एका तरुणीवर अत्याचार करीत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी फैसल उर्फ तेजा (२५, रा. किलेअर्क) याच्या विरोधात बलात्कार, आयटीसह ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

सिडको पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार पीडित तरुणीची कॉलेजमध्ये असताना एका मित्राने आरोपी फैसल तेजा याच्यासोबत ओळख करून दिली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर फैसल उर्फ तेजाच्या तिच्यावर राहत्या घरी नेऊन अनेकवेळा अत्याचार केले. १० एप्रिल रोजी त्याने मोबाईल संपर्क करीत तु घराबाहेर ये नाहीतर तुझे अश्लील व्हिडिओसह फाेटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

त्यानुसार घराच्या बाहेर आलेल्या पीडितेला त्याने शिवीगाळ करीत मारहाण केली.तसेच गाडीवर बसवून त्याच्यासोबत घरी घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने मारहाण करीत जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच त्याठिकाणी नग्न छायाचित्र, व्हिडिओ तयार केले. त्यानंतरही व्हायरल करण्याची धमकी दिली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी त्याने बोलावून घेत तुझ्यामुळेच मी जेलमध्ये गेलो असल्याचे सांगत, मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने ११२ नंबर डायल करीत पोलिसांची मदत घेतली. बेगमपुरा पोलिसांनी मेडिकल मेमो देऊन दवाखान्यात पाठविले. यानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात करीत आहेत.दोन दिवसापुर्वीच केली अटक

दोन दिवसापुर्वीच तेजाला गुन्हे शाखेच्या पथकाने किलेअर्क भागात अटक केली होती. त्याच्या ताब्यातून साडेसतरा हजाराचे नशेचे सिरप जप्त केले आहे. तेजा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात तेरा गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद