शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

सव्वाचार हजार मतदारांनी निवडले ‘नोटा’

By admin | Updated: October 20, 2014 00:32 IST

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी पहिल्यांदाच मतदार यंत्रावर ‘नोटा’ (नन आॅफ द अ‍ॅबाऊ) चा पर्याय देण्यात आला आहे.

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी पहिल्यांदाच मतदार यंत्रावर ‘नोटा’ (नन आॅफ द अ‍ॅबाऊ) चा पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायाला जिल्ह्यातील तब्बल ४ हजार २७७ मतदारांनी पसंती दिल्याचे दिसते. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाचा विचार केला असता, तुळजापूर मतदारसंघातील सर्वाधिक १ हजार ३१४ जणांनी ‘नोटा’चा वापर केल्याचे समोर आले आहे.एखाद्या मतदारसंघामध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार लायक वाटत नसल्यास अनेकजण मतदानाचा हक्क बजावत नव्हते. त्यामुळे मतदानाचा टक्काही घसरत होता. मात्र निवडणूक आयोगाने अशा मतदारांना त्यांच्या भावना मतदारांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात याव्यात, यासाठी मतदान यंत्रावर ‘नोटा’ हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातील हजारो मतदारांनी या पर्यायाचा वापर केला आहे. उस्मानाबाद, तुळजापूर मतदारसंघामध्ये तर अपक्ष उमेदवारापेक्षाही ‘नोटा’लाच अधिक पसंती मिळाली असल्याचे दिसते. या मतदार संघातील अ‍ॅड. रामेश्वर धोंडिबा शेटे यांना १ हजार ५१, पिंटू पांडुरंग चांदणे यांना ७६९, सुबराबाई शिवाजी राठोड यांना ६२९, संजय सुरेश रेणुके यांना ४७१, किरण जाधव यांना ४३३ तर राहुल नागनाथ जवान यांना ३८५ मते मिळाली. याच्या उलट ‘नोटा’ला १ हजार ३१४ मतदारांनी पसंती दिली.दरम्यान, हीच अवस्था अन्य तालुक्यातही पहावयास मिळते. परंडा विधानसभा मतदारसंघातहीे १ हजार १५१ जणांनी ‘नोटा’चे बटन दाबले आहे. येथेही अपक्ष ‘नोटा’ एवढी मते घेवू शकले नाहीत. संभाजी नानासाहेब शिंदे ७७२, आर्यनराजे किसनराव शिंदे ५३६ तर अ‍ॅड. प्रबुद्धा साहेबराव अहिरे यांना ४८१ एवढी मते मिळाली. हेच चित्र उस्मानाबाद मतदार संघातही दिसते. अनेक अपक्षांना पाचशेचा आकडाही पार करता आलेला नाही. मात्र ‘नोटा’ला ६०१ इतकी मते मिळाली आहेत. उमरगा मतदार संघामध्येही यापेक्षा वेगळे चित्र नाही. येथेही तब्बल १ हजार २११ जणांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. एकूण चारही मतदारसंघात ‘नोटा’ मिळालेल्या मतांची गोळागेरीज केली असता, हा आकडा आता ४ हजार २७७ वर जावून ठेपतो. एकूणच चारही मतदारसंघामध्ये निवडणूक रिंगणामध्ये असलेले उमेदवार उपरोक्त सव्वाचार हजारांवर मतदारांना योग्य असल्याचे वाटले नाही, हेच यातून समोर येते.