शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

हजार कोटींचे प्रस्ताव; सव्वाशे कोटींच्या रस्त्यांची निवड कशी करायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:24 IST

औरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने शहरातील रस्ते सिमेंट पद्धतीने विकसित करावेत म्हणून १२५ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. या निधीतून ...

ठळक मुद्देकवायत सुरू : दोन दिवसांमध्ये रस्त्यांची यादी तयार करण्याचा महापौरांचा दावा

औरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने शहरातील रस्ते सिमेंट पद्धतीने विकसित करावेत म्हणून १२५ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. या निधीतून कोणत्या रस्त्यांची निवड करावी, असा मोठा पेच महापालिकेत निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या नगरसेवकांनी महापौरांकडे तब्बल एक हजार कोटींच्या रस्त्यांचे प्रस्ताव दिले आहेत. त्यातून १२५ कोटींच्या रस्त्यांची निवड करायची आहे. दोन दिवसांमध्ये यादी तयार करून शासनाकडे पाठविणार असल्याचा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला.केंद्र आणि राज्य शासनाने मागील दहा वर्षांमध्ये महापालिकेला किमान ६०० ते ७०० कोटींचा निधी दिला. वेगवेगळ्या योजनांसाठी हा निधी होता. प्रत्येक योजनेत महापालिकेला अपयशच आले. २०१७ मध्ये रस्ते गुळगुळीत करण्यासाठी शासनाने १०० कोटींचा निधी दिला. या निधीतील कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यातच राज्य शासनाने आणखी १२५ कोटींचा निधी रस्त्यांसाठी मंजूर केला. मागील २७ दिवसांपासून महापालिकेत एकच काथ्याकुट सुरू आहे. रस्ते कोणते विकसित करायचे...? सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी आपल्या वॉर्डातील डी.पी.रोड १२५ कोटींच्या योजनेत घ्यावेत, असा आग्रह धरला आहे. महापौरांकडे आतापर्यंत एक हजार कोटींचे प्रस्ताव आले आहेत. यातून मोजकेच रस्ते कसे निवडायचे यावरून वाद सुरू आहे. शिवसेना-भाजप आणि एमआयएम पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून १२५ कोटींत आपल्या वॉर्डातील रस्ते कशा पद्धतीने येतील यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. महापालिकेच्या या अंतर्गत वादात लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागेल. त्यात मनपाला निविदा प्रक्रिया राबविता येणार नाही, याचा विसर सर्वांना पडला आहे. रस्त्यांची यादी तयार करण्याच्या मुद्यावर जोरदार रस्सीखेच सुरू असताना महापौर नंदकुमार घोडेले यांनी दोन दिवसांमध्ये यादी तयार होईल, शासनाकडेही पाठविण्यात येईल, असा दावा केला.--------------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा