शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात रक्तदोषाचे तीन हजारांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 19:35 IST

जिल्ह्यात थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल यांसारख्या रक्तदोषाचे तीन हजारांवर रुग्ण आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल यांसारख्या रक्तदोषाचे तीन हजारांवर रुग्ण आहेत. महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाने या रक्ताधित व्यक्तींनाही दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेलच्या रुग्णांनाही शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळणार आहे.

जिल्ह्यात आजघडीला हिमोफेलियाचे ५५०, थॅलेसेमियाचे २ हजार, तर सिकलसेलचे १ हजार रुग्ण असल्याची माहिती हिमोफेलिया सोसायटीच्या औरंगाबाद चॅप्टरतर्फे देण्यात आली. थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल यांसारख्या रक्तदोषाने रुग्णांना अपंगत्व येते. केवळ दिव्यांग प्रमाणपत्राअभावी अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर येत होती. राज्य सरकारने रक्तदोषामुळे येणाऱ्या दिव्यांगत्वासह एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय १४ सप्टेंबर रोजी जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तदोषाच्या रुग्णांनाही दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. नव्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांगत्वाचे मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी कार्यप्रणालीही निश्चित करण्यात आली आहे.

२१ प्रकारचे दिव्यांगत्वदृष्टिदोष, कर्णबधिरता, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहुदिव्यांगता, शारीरिक वाढ खुंटणे, स्वमग्नता, मेंदूचा पक्षाघात, स्नायूंची विकृती, मज्जासंस्थेचे जुने आजार, अध्ययन अक्षमता, मल्टिपल स्क्लेरॉसिस, वाचा व भाषा दोष, अ‍ॅसिड अटॅक व्हिक्टिम, पार्किनसन्स, दृष्टिक्षिणता, कुष्ठरोगासह थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल या एकूण २१ प्रकारच्या व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

सुधारणा करण्याची गरज आहे

थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेलच्या रुग्णांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यांचा अनेकांना फायदा होईल; परंतु हिमोफेलियाच्या टक्केवारीसंदर्भात सुधारणा करण्याची गरज आहे,असे वाटते.-प्रभुराम जाधव, हिमोफेलिया सोसायटी, औरंगाबाद चॅप्टर

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय