शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

पक्ष सोडून गेले ते गद्दारच; भरारीसाठी पक्ष संघटनेत बदल हवा: अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:29 IST

आपण कुठे तरी कमी पडलो. एका पराभवाने काही होत नाही. पुन्हा नव्या जोमाने लढू

छत्रपती संभाजीनगर : युवा सेनेचे पदाधिकारी आता म्हातारे होत आले. गटप्रमुख, शाखाप्रमुख कागदावर आहेत. उपजिल्हाप्रमुख नावालाच असून, पक्ष संघटनेसाठी कोणी वेळच देत नाही. पक्षाला पुन्हा नव्याने उभारी घ्यायची असेल तर बदल हवा. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. ज्यांचा पराभव होणार होता, ते निवडून आले. आपण कुठे तरी कमी पडलो. एका पराभवाने काही होत नाही. पुन्हा नव्या जोमाने लढू, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

संत एकनाथ रंगमंदिरात ‘घे भरारी’ या नावाखाली उद्धवसेनेने जिल्हा मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात प्रारंभी विधानसभा लढलेले उमेदवार राजू शिंदे, दत्ता गोर्डे, दिनेश परदेशी, बाळासाहेब थोरात यांच्यासह महिला आघाडीच्या आशा दातार यांनी मनोगत व्यक्त केले. दानवे म्हणाले की, ‘रोज बातम्या येतात, हे पक्ष सोडून जाणार, ते सोडून जाणार...एकदा तर मीच जाणार असे छापून आले. यांना प्रत्युत्तर देऊ नका. जे पक्ष सोडून गेले, ते मंत्री होतील, मुख्यमंत्री होतील, पण समाजात प्रतिष्ठा मिळणार नाही. राज्यात ईव्हीएमवर रोष आहेच. जे निवडून आले, त्यांनीही स्वत:ला चिमटे घेतले असतील... उद्धवसेनेला ५ लाख २८ हजार मते जिल्ह्यात मिळाली. मविआला ७ लाख ६३ हजार, महायुतीला ८ लाख ५० हजार मते मिळाली. आपण कुठेही कमी पडलो नाही. पुन्हा जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. सचिन तायडे, आनंद तांदूळवाडीकर यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा पाटील डोणगावकर यांनी आभार मानले.

आज एका व्यासपीठावर आलो...चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे एका व्यासपीठावर येत नाहीत, असे म्हटले जाते. आज आम्ही एकत्र आलो ना ? कोणीही खैरे यांचे कान भरतात. माझ्याकडेही असे येतात. कान भरतात, मी या कानाने ऐकतो, त्या कानाने सोडून देताे. आम्हाला बदनाम करू नका. आम्ही एकच आहोत, असे दानवे म्हणताच हशा पिकला.

‘त्या’ नेत्यांवर तोंडसुख‘माझ्यासोबत सावलीसारखे असणारे सोडून गेले. त्यांना पक्षाने खूप काही दिले. मी शेवटच्या श्वासापर्यंत येथेच राहणार...गटबाजीत पडू नका, पुन्हा जोमाने कामाला लागा’, म्हणत चंद्रकांत खैरे यांनी खचाखच भरलेल्या सभागृहाला दंडवत घातले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAmbadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरे