शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
2
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
3
चीन भारतात घुसला; 56 इंची छातीचा देशाला काय उपयोग? खरगेंचा पीएम मोदींवर निशाणा
4
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
5
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
6
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
7
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
8
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
9
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
10
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
11
Kitchen Tips: गॅस सिलेंडरची नळी कधी बदलायची? स्फोट टाळण्यासाठी माहीत हवे 'हे' नियम!
12
Sydney Sweeney: सिडनी स्वीनीच्या हॉटनेसपुढं सगळंच फिकं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ
13
सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याआधीच कशा बनल्या मतदार? १९८० च्या मतदार यादीवरून कोर्टाने बजावली नोटिस
14
तगडा अभिनय तरीही 'धुरंधर'साठी अक्षय खन्नाला रणवीरपेक्षा खूपच कमी मानधन; मिळाले फक्त 'इतके' पैसे
15
"बच्चे बड़े हो जाते हैं, लेकिन…" IPL वर वसीम अक्रमची तिखट टिप्पणी; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
अनिल अंबानींचा मुलगा CBI च्या फेऱ्यात; जय अनमोल अंबानींवर २२८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, प्रकरण काय?
17
‘त्या’ दिवशी आधी जिल्हा, मग राज्य बंद करण्यात येईल; संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगेंचा इशारा
18
प्रदूषणामुळे वाढतोय सायलेंट स्ट्रोकचा धोका? लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, निष्काळजीपणा ठरेल घातक
19
तुमची एक छोटीशी चूक आणि PPF च्या व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स, जाणून घ्या अधिक माहिती
20
Travel : भारतातील 'या' हिल स्टेशनला जाल तर इटलीचं सौंदर्य विसराल; महाराष्ट्राच्या तर आहे अगदीच जवळ!
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई; दोन विक्रेत्यांना थेट पोलिस कोठडीची हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:50 IST

सोशल मीडियावरून मांजाची ऑर्डर, अधिकच्या उत्पन्नासाठी जनरल स्टोअर्स, मोबाईल विक्रेते बनले जीवघेण्या मांजाचे तस्कर

छत्रपती संभाजीनगर : जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री एका चिमुकल्याच्या जिवावर बेतल्यानंतर याची साठवणूक करून विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या चोवीस तासांत जिन्सीच्या संजयनगरमधून शेख फिरोज हबीब शेख (वय ४२) याला, तर साताऱ्यातून इस्माईल शेख ऊर्फ आदिल हाजी शेख (३२) या दोन विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. ४ डिसेंबर रोजी तीन वर्षीय स्वरांश संजीव जाधव (रा. हर्सूल) हा चिमुकला गळा कापून गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करून वीसपेक्षा अधिक टाके देण्यात आले. या घटनेनंतर शहर पोलिस जागे झाले आहेत.

गुन्हे शाखेची तिघांवर कारवाई, दोघांना अटकगुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे यांच्या पथकाने विक्रेत्यांचा शोध सुरू केला. यात संजयनगरच्या रिजवाना बेगम निसार शेख (वय ४५) व शेख फिरोज हबीब शेख (४२) यांच्या घरात छापा , तर साताऱ्यात शेख इस्माईल याच्या दुकानात छापा मारत त्याला ताब्यात घेतले. फिरोजकडून ५१, तर इस्माईलकडून ४ गट्टू जप्त करण्यात आले. न्यायालयाने फिरोजला १ दिवसांची, तर इस्माईलला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

अधिकाऱ्यांकडे तपास, गुन्हे शाखेला चौकशीचे आदेशसोमवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सर्व पोलिस ठाणे प्रभारी, गुन्हे शाखेला नायलाॅन मांजाबाबत कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले. शिवाय, विक्रेत्यांना अटक करावी, न्यायालयात सखोल तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. अंमलदाराऐवजी पोलिस उपनिरीक्षक व त्यावरील अधिकाऱ्यांकडे गुन्ह्याचा तपास द्यावा व गुन्हे शाखेने त्या आरोपीची चौकशी करून तस्करीबाबत धागेदारे मिळवावे, अशा सूचना केल्या. सोमवारी जवळपास २५ पतंग विक्रेत्यांची पोलिस आयुक्तालयात बैठक घेण्यात आली.

सदाेष मनुष्यवधाचा गुन्हानायलॉन मांजा विक्रेत्यांवर बीएनएस ११० , २२३, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ कलम ५ अन्वये गुन्हा दाखल होईल. नायलॉन मांजाचा वापर, विक्री होत असल्यास नागरिकांनी पुढे यावे. त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. ११२, ०२४०-२२४०५०० या क्रमांकासह पोलिस आयुक्तांचा व्हॉट्सॲप क्रमांक ९२२६५१४००१ वर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Crackdown on deadly nylon kite string sellers; two arrested.

Web Summary : Aurangabad police arrested two sellers of deadly nylon kite string after a child was injured. Police seized strings and filed charges under environmental protection laws, and culpable homicide. Citizens are urged to report sellers, with identity protection guaranteed.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर