शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
4
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
5
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
6
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
9
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
10
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
11
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
12
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
13
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
14
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
15
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
16
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
17
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
18
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
19
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

बिबट्याचे 'ते' व्हिडीओ छत्रपती संभाजीनगरचे नाहीत; जुने व्हिडीओ व्हायरल, नागरिकांत संभ्रम

By सुमेध उघडे | Updated: July 19, 2024 18:31 IST

छत्रपती संभाजीनगरात बिबट्या अद्याप मोकाटच; जुने व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांत संभ्रम

छत्रपती संभाजीनगर : सोमवारी पहाटे शहरात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर विविध भागात बिबट्याचा वावर सुरूच आहे. बिबट्या पकडण्यात अद्याप यश आले नाही. मात्र यादरम्यान शहरात इतर ठिकाणचे जुने व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. बंगळुरू, नाशिक येथील जुने व्हिडिओ शहरातील असल्याचे मेसेज सोशल मिडियात व्हायरल झाल्याने नागरिकांत संभ्रम असून प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. 

उल्कानगरी, शंभुनगर, फतियाबाद व सातारा डोंगराच्या मागे पांगरा परिसरात अशा शहराच्या चारही बाजूंनी गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. बुधवारी पहाटे तर बिबट्या चक्क ‘प्रोझोन मॉल’मध्येच शिरला. बिबट्या ‘प्रोझोन मॉल’मध्ये आल्याचे २४ तासांनंतर कळले. त्यानंतर मॉल परिसरात गुरुवारी तीन पिंजरे लावले. दरम्यान, सोमवारी पहिल्यांदा बिबट्याचे दर्शन झाल्यापासून शहरात इतर ठिकाणची जुनी व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामुळे सर्वजण रेस्क्यू टीमला विचारणा करत आहेत. सर्व सोडून ही टीम व्हायरल व्हिडिओवर लक्ष देऊन त्याची शहानिशा करत आहे. याचा परिणाम बिबट्या पकडण्याचा मोहिमेवर देखील होत आहे. 

पहिला व्हिडिओ:दर्गा उड्डाणपूलाजवळ बिबट्याशुक्रवारी सकाळीच विविध सोशल मीडिया ग्रुपमध्ये बिबट्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. उड्डाणपुलाच्या बाजूला बिबट्या बसलेला असून तो डरकाळी फोडत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. समोरून एक दुचाकी येत आहे तर बाजूने एक हिरव्या रंगाची बस जात असल्याचे दिसते. फॅक्ट चेक केले असता हा व्हिडिओ बंगळुरू येथील १९ एप्रिल २०२३ चा असल्याचे यु ट्यूबवर दिसून आले.

दूसरा व्हिडिओ: बिबट्या आलीशान घरात पकडलात्यानंतर दुपारी एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात बिबट्या शहरातील सिडको एन-१ भागातील आलीशान भागातील एका घरात पकडल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, हा व्हिडिओ देखील जुना असल्याचे सिद्ध झाले. हा व्हिडिओ नाशिक येथील १९ नोव्हेंबर २०२३ चा असल्याचे ट्विटरवर दिसून आले.

शहानिशा करा, संयम बाळगासोशल मिडियात विविध मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. फॉरवर्ड करण्याच्या आधी त्याची शहानिशा करा. अशा मेसेजमुले नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तसेच रेस्क्यू टीमच्या कामात देखील यामुळे अडथळा येत आहे. - सूर्यकांत मंकावार, उपवनसंरक्षक, प्रादेशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर

असे झाले बिबट्याचे दर्शनप्रथम- सोमवारी पहाटे उल्कानगरी वेळ- पहाटे ३:४७दुसऱ्यादा- मंगळवारी पहाटे शंभुनगरात पोद्दार शाळेच्या मागे.-वेळ पहाटे ३:३०तिसऱ्यांदा - बुधवारी काबरानगर वेळ- पहाटे ३:३० वाजेदरम्यानचौथ्यांदा- माळीवाडालगत फतियाबाद येथील शेतात दोन पिलांसह मादी रात्री ९:३० वाजता.पाचव्यांदा- बुधवारी- गजबजलेल्या सिडको परिसरातील ‘प्रोझोन माॅल’च्या पार्किंग गेट परिसरात एमआयडीसी चिकलठाणा परिसरातून आगमन झाले.

टॅग्स :leopardबिबट्याAurangabadऔरंगाबादforest departmentवनविभाग