शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हा तरुण मावळा रोजच साजरी करतो शिवजयंती;पगार अत्यल्प असूनही पुतळ्यासाठी हार,फुलांवर खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 14:17 IST

शिवजयंती विशेष:  वर्षभर छत्रपतींच्या पुतळ्याच्या स्वच्छतेकडे कुणाचेही लक्ष नसते, ही बाब त्याच्या जिव्हारी लागली.

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : शिवरायांवर निस्सीम श्रद्धा असलेला तरुण दोन वर्षांपासून पुंडलिकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रोज स्वच्छता आणि मनोभावे पूजन करत आहे. हा अवलिया तरुण सध्या पुंडलिकनगर परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. खासगी नोकरी करून मिळणाऱ्या अत्यल्प पगारातून तो छत्रपतींच्या पुतळ्यासाठी हार आणि फुलांवर खर्च करतो.

अक्षय दादाराव पाटील (२३, रा. हुसेन कॉलनी) असे या अवलिया शिवप्रेमीचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी तो घराजवळील पुंडलिकनगर चौकात उभा होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर धूळ साचलेली दिसली. शिवजयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंतीला या पुतळ्यांची शिवप्रेमी स्वच्छता करतात, मात्र यानंतर वर्षभर छत्रपतींच्या पुतळ्याच्या स्वच्छतेकडे कुणाचेही लक्ष नसते, ही बाब त्याच्या जिव्हारी लागली. यानंतर पुतळ्याची नियमित स्वच्छता करण्याची खूणगाठ त्याने बांधली. लोडिंग रिक्षा चालविणाऱ्या त्याच्या वडिलांनीही त्यास प्रोत्साहन दिले. तो नित्यनेमाने हंडा आणि बादली भरून पाणी घेऊन चौकात जातो. छत्रपतींच्या पुतळ्याला पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर पुष्पहार विकत आणून पुतळ्याला घालतो. केवळ तीन हजार रुपये वेतन असताना तो हा खर्च करतोय. काही जणांनी त्याला हार, फुलांचे पैसे देतो, असे सांगितले, मात्र कोणीही आजपर्यंत त्याला एक रुपयाही दिलेला नाही.

दोन महिन्यांपासून वडिलांनी केली पुतळ्याची स्वच्छताडिसेंबर २०१९ पासून अक्षयचे हे कार्य अविरत सुरू असताना दोन महिन्यांपूर्वी त्याची प्रकृती खराब झाली. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. या काळात खंड पडू नये, म्हणून त्याचे वडील दादाराव पाटील यांनी छत्रपतींच्या पुतळ्याची स्वच्छता केली. आता तो पूर्णपणे बरा झाल्याने त्याने पुन्हा त्याचे कार्य सुरू केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज