शहरं
Join us  
Trending Stories
1
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
2
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
3
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
4
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
5
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
6
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
7
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
8
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
9
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
10
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
11
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
12
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
13
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
14
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
15
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
16
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
17
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
18
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या टॉप ५ महिला क्रिकेटपटू!
19
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
20
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

हा विंग कमांडर टी. आर. जाधव यांचा गौरव समारंभ नव्हे तर कृतज्ञता सोहळा: पुरुषोत्तम खेडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:01 IST

विंग कमांडर टी. आर. जाधव यांच्यावर प्रेमाचा वर्षाव, राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते गौरव ग्रंथाचे प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर : हा गौरव समारंभ नव्हे तर कृतज्ञता सोहळा आहे. विंग कमांडर टी. आर. जाधव यांच्यातला एक जरी गुण प्रत्येकाने अंगिकारला, तर समाज समृद्ध व संपन्न व्हायला नक्कीच मदत होईल. लोकमत हेल्पलाईनच्या माध्यमातून चार लाख प्रकरणे हाताळून दीड लाख प्रकरणात न्याय मिळवून देणारा न्यायाधीश म्हणजे विंग कमांडर टी. आर. जाधव होत. ते विंग कमांडर तर आहेतच; पण वयाच्या ८७ व्या वर्षात पदार्पण करूनही ते यंग कमांडर आहेत, असे गौरवोद्गार मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी रविवारी सत्कार सोहळ्यात काढले.

मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक टी. आर. जाधव यांच्या गौरव समारंभप्रसंगी भानुदास चव्हाण सभागृहात खेडेकर हे बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजि. डॉ. विजय घोगरे होते.

‘लोकमत’मधील योगदानाचा पट उलगडलायाच समारंभात, राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री व लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते ‘विंग कमांडर टी. आर : एक प्रेरणादायी समर्पित जीवन’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात झाले. ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक म्हणून टी. आर. जाधव यांनी कशी शिस्त आणली, कामावर उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना ते कशी शिस्त लावत असत, पुढे स्वत:हून विनामोबदला सांभाळलेली हेल्पलाईनची यशस्वी धुरा अशा अनेक कामांचा उल्लेख राजेंद्र दर्डा यांनी केला. यासोबतच कारगिल युद्धानंतर लोकमतच्या माध्यमातून वसतिगृहांच्या निर्मितीतील त्यांची भूमिका हा सारा प्रवास कसा स्तिमित करणारा होता, याबद्दल राजेंद्र दर्डा भरभरून बोलले.

कर्ती माणसं किती अबोल असतात...सत्काराला उत्तर देताना विंग कमांडर टी. आर. जाधव यांनी सविस्तर बोलावं, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. परंतु, कुठलेही भाषण न करता सर्वांचे आभार मानत व विवेकानंदांची आठवण काढत त्यांनी भाषण संपवले. यावर टिप्पणी करताना खेडेकर म्हणाले, कर्ती माणसं किती अबोल असतात याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे विंग कमांडर टी. आर. जाधव! यावर टाळ्यांचा कडकडाट होतच राहिला. अडाणी असलेल्या मायबापांनी आपल्या पोरांच्या पंखांमध्ये बळ आणण्यास समर्थ केले होते. आता शिकल्यासवरलेल्यांनी आपल्या पोरांच्या पंखांमध्ये बळ आणण्यासाठी विंग कमांडर टी. आर. जाधव यांच्या ग्रंथातील मनोगताचे व संपूर्ण ग्रंथाचे सामूहिक पारायण केले पाहिजे, असे आवाहनही खेडेकर यांनी यावेळी केले. टी. आर. जाधव यांच्या पत्नी दिवंगत विजयालक्ष्मी यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

कर्तृत्वाच्या साक्षीदारांचे मनोगतप्रास्ताविक इंजि. चंद्रशेखर शिखरे यांनी केले. संपादकीय भूमिका ॲड. वैशाली डोळस यांनी मांडली. मानपत्राचे वाचन प्रा. शिवानंद भानुसे यांनी केले. विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या माजी आमदार रेखा खेडेकर, उद्योगपती सुनील किर्दक, लेफ्टनंट कर्नल सुनील ढगे, सामाजिक कार्यकर्ते ग. मा. पिंजरकर व विंग कमांडर जाधव यांच्या कन्या डॉ. जयश्री मोरे यांनी मनोगत मांडताना जाधव यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. फुले पगडी, मानपत्र, मासाहेब जिजाऊ व शिवरायांची प्रतिमा देऊन जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने व जिजाऊ वंदनेने समारंभाची सुरुवात झाली. संजीव साठे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली कडू यांनी आभार मानले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरIndian Armyभारतीय जवान