शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

जिल्ह्यात साडेचार हजार तीव्र कुपोषित बालके

By admin | Updated: July 15, 2017 00:25 IST

नांदेड: जिल्ह्यातील गरोदरमाता आणि बालकांच्या आरोग्याची हेळसांड होत असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या साडेचार हजारांवर पोहोचली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यातील गरोदरमाता आणि बालकांच्या आरोग्याची हेळसांड होत असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या साडेचार हजारांवर पोहोचली आहे़ कुपोषणाचे अधिक प्रमाण असलेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली, भंडारा, पालघर, नंदुरबार या जिल्ह्यांच्या यादीत आता नांदेडचाही समावेश होण्याची शक्यता आहे़ ग्रामीण भागात गरोदरमाता व बालकांच्या आरोग्यावर काम करणाऱ्या आरोग्यसेविका असो किंवा तालुकास्तरावर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी़ बालकांना सदृढ करणे, त्यांना आरोग्यदायी जीवन अन् बौद्धिक क्षमता वाढविणे हा त्यामागचा उद्देश असतो़ परंतु यंत्रणेत समन्वयाचा अभाव असल्यामुळे दिवसेंदिवस ही परिस्थिती गंभीर होत चालली आहे़ आजघडीला जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांची संख्या ४ हजार ५०८ वर पोहोचली आहे़त्यात किनवट- २८०, मुखेड-२५७, देगलूर-१०४, बिलोली-१०९, कंधार-७८५, भोकर-७६, हदगाव-२६०, नांदेड-३८५, लोहा-९०९, नायगांव-१४५, माहूर-३८०, उमरी-१४७, मुदखेड-२८०, हिमायतनगर-१४९, धर्माबाद- १८१, अर्धापूर तालुक्यातील ६१ बालकांचा समावेश आहे़ जिल्ह्यात सहा वर्षांखालील बालकांची संख्या २ लाख ७४ हजार ६६६ असून त्यातील वजने घेतलेल्या बालकांची संख्या २ लाख ५५ हजार ९२३ एवढी आहे़ तर कमी वजनाच्या बालकांची संख्या १७ हजार ८४२ एवढी आहे़ या बालकांची दर सहा महिन्याला आरोग्य तपासणी करण्यात येते, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे़ परंतु प्रत्यक्षात त्यामध्ये तथ्य किती? हा संशोधनाचा विषय आहे़ नांदेड जिल्ह्यात यापूर्वी किनवट, हदगाव, माहूर, हिमायतनगर या तालुक्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक होते़, परंतु हे तालुके आता कुपोषणमुक्तीकडे वेगाने वाटचाल करीत आहेत़