शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीमुळे आंदोलनाचे हत्यार तूर्तास म्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:48 IST

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असल्यामुळे महसूल कर्मचारी संघटनेने मंगळवारी सायंकाळी आंदोलन थांबविले आहे. शुक्रवारपासून पुन्हा आंदोलन करणार असल्याची भूमिका जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष सतीश तुपे, सरचिटणीस अनिल सूर्यवंशी, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे, सरचिटणीस अरविंद धोंगडे यांनी जाहीर केली.

ठळक मुद्देमहसूल कर्मचारी संघटना : गुरुवारनंतर पुन्हा सुरू करणार काम बंद आंदोलन

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असल्यामुळे महसूल कर्मचारी संघटनेने मंगळवारी सायंकाळी आंदोलन थांबविले आहे. शुक्रवारपासून पुन्हा आंदोलन करणार असल्याची भूमिका जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष सतीश तुपे, सरचिटणीस अनिल सूर्यवंशी, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे, सरचिटणीस अरविंद धोंगडे यांनी जाहीर केली.१८ मेपासून संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मात्र, बुधवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रंगीत तालमीच्या आणि गुरुवारी होणाºया मतमोजणीच्या अनुषंगाने संघटनांनी लोकशाहीसाठी माघार घेतली आहे. मतमोजणी प्रक्रियेनंतर पुन्हा संघटना मागण्यांवर ठाम राहणार असल्याचे गिरगे, सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. शुक्रवारपासून महसूल संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.आंदोलनाची पार्श्वभूमी अशी, कन्नडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात १५ मेला बापू रिंढे यांनी आत्महत्या केली. आत्महत्येप्रकरणी मंडळ अधिकारी बी.एन. गवळी, उपविभागीय अधिकाऱ्यांचे वाहनचालक सुनील चिंधुटे यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंदविला. सदरील प्रकरणात पोलिसांना नि:पक्षपातीपणे भूमिका बजावता आला नाही. त्यामुळे तेथील पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात यावे, तसेच महसूल कर्मचाºयांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत. या मागणीसाठी महसूलमधील सर्व संघटनांनी १८ मेपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा परिमाण दुष्काळ उपाययोजनांवर होत नसल्याचा दावा संघटनांनी केला आहे. मात्र, महसूल कामकाजावर याचा परिणाम झाला आहे.शुक्रवारी ठरणार भूमिकाजिल्ह्यातील ८०० हून अधिक कर्मचारी कामबंद आंदोलनात आहेत. महसूल संघटनांच्या मागणीवर प्रशासनाने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. मतमोजणीची प्रक्रिया संपताच महसूल संघटना पुन्हा आंदोलन करणार आहेत. मतमोजणीत तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून कार्यरत राहणार आहेत. मतमोजणीनंतर महसूल विभागातील संघटनेच्या सर्व पदाधिकाºयांची बैठक होईल. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. शुक्रवारनंतर जिल्हापातळीवर आणि लगेचच मराठवाडा पातळीवर सर्व संघटनांकडून आंदोलन करण्याचा विचार होईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादEmployeeकर्मचारी