शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

कोरोनाची तिसरी लाट मराठवाड्याच्या उंबरठ्यावर; तूर्त लॉकडाऊन नाही, मात्र खबरदारीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 12:00 IST

Corona In Marathawada :सध्याची परिस्थिती तिसऱ्या लाटेची चाहूल असून दुसऱ्या लाटेत दोन हजार रुग्ण होते, यावेळी एकाच दिवसात १० हजार रुग्ण आढळण्याचे प्रमाण राहू शकते.

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोना (corona virus ) , ओमायक्रॉन ( Omicron Variant ) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर ( Sunil Kendrekar ) यांनी दोन दिवस बैठक घेतली आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांची चार तास बैठक घेऊन जिल्हानिहाय काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेत विभागात लॉकडाऊन करणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शाळांबाबत स्थानिक जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशा सूचना विभागीय प्रशासनाने दिल्या आहेत.

सध्याची परिस्थिती तिसऱ्या लाटेची चाहूल असून दुसऱ्या लाटेत दोन हजार रुग्ण होते, यावेळी एकाच दिवसात १० हजार रुग्ण आढळण्याचे प्रमाण राहू शकते. ७० ते ८० टक्के रुग्ण घरीच बरे होतील. ज्यांना जास्त त्रास होईल, त्यांच्यावर उपचार करावे लागतील. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तयारी खूप केली असली, तरी रुग्णसंख्या वाढल्यानंतर ताण वाढू शकतो. सध्या तीन ते चार दिवसात रुग्ण बरे होत आहेत. परंतु घरात एक जण पॉझिटिव्ह आला तर इतरांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यावीच लागणार आहे. अशा सूचना आयुक्तांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दुसऱ्या लाटेत अशी होती परिस्थिती१ मार्च २०२१ रोजी विभागातील आठ जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण मिळून ६८७ रुग्ण कोरोनाग्रस्त होते. १६ मार्च रोजी हा आकडा २६०० पर्यंत गेला होता. शहरी भागात १४४२, तर ग्रामीणमध्ये ११५८ रुग्णांची नोंद झाली होती. ५३६ कन्टेन्मेंट झोन विभागात होते. दुसऱ्या लाटेत मृत्यूदर कमी असणे, एवढीच जमेची बाजू त्यावेळी होती.

विभाग तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावरमराठवाडा कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असून, नववर्षाच्या पहिल्या पाच दिवसात विभागात ६०७ वर कोरोना रुग्णांची भर पडली आहे. चार महिन्यानंतर रुग्णसंख्येचा आकडा वाढला आहे. विभागात १ जानेवारीला ६६ रुग्ण होते. त्यात औरंगाबाद १५ तर लातूरमधील १८ रुग्णांचा समावेश होता. २ जानेवारीला १०८ नवीन रुग्णांची भर पडली. ३ जानेवारीला पुन्हा १११ नवीन रुग्णांची भर पडली. ६०७ रुग्णांमध्ये औरंगाबादच्या २१६ रुग्णांचा समावेश आहे.

१ ते ५ जानेवारीपर्यंतची रुग्णसंख्याऔरंगाबाद-२१६लातूर-१०७उस्मानाबाद-९४नांदेड-५९जालना-४७बीड-३०परभणी-४५हिंगोली-०९एकूण ६०७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarathwadaमराठवाडाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबाद