शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

दिवाळीपूर्वीच चोरट्यांचा धुमाकूळ: ११ तोळे सोन्यासह रोख रक्कम चोरी

By राम शिनगारे | Updated: November 5, 2023 19:45 IST

पुंडलिकनगर, छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटना

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीपूर्वीच चोरट्यांनी शहरात दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन घरातून चोरट्यांनी ११ तोळे सोन्याच्या दागिन्यासह १२ हजार राेख रक्कम लंपास केली, तर छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन दुकाने फोडल्याची घटना मागील २४ तासांमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित ठाण्यात गुन्हे नोंदविले आहेत.

पहिली घटना हनुमाननगर, गारखेडा परिसरात ३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. फिर्यादी महिला दुपारी घराला कडी लावून गणेशनगर येथे ब्युटी पार्लरसाठी गेल्यानंतर चोरटे त्यांच्या दरवाजाची कडी उघडून आत घुसले. कपाटात ठेवलेले साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याची मण्याची पाेत, एक तोळ्याचे नेकलेस, एक तोळ्याच्या दोन अंगठ्या आणि एक ग्रॅम सोन्याची नथ, असा एकूण ६६ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. दुसरी घटना पारिजातनगरातील प्रभाकर गणपतराव पवार यांच्या घरात ४ नोव्हेंबरच्या रात्री १२ ते २ वाजेच्या दरम्यान घडली.

पवार यांच्या घरातून चोरट्यांनी अडीच तोळे सोन्याची पोत, एक तोळ्याची अंगठी, ९ ग्रॅम सोन्याचे कानातील रिंग आणि रोख २ हजार रुपये चोरून नेले. तिसरी घटना पारिजातनगर येथीलच सुयोग शरदचंद्र सांबरे यांच्या घरात घडली. त्यांच्या घरातून चोरट्यांनी १० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. ऐन दिवाळीच्या तोंडावरच शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे घटनांवरून समोर आले आहे.

पडेगावात तीन दुकाने फोडलीपडेगावातील मीरानगर येथील तीन दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना ३ नोव्हेंबरच्या रात्री घडली. फिर्यादी कुंतीलाल अंबादास हिरण (जैन) यांचे जैन मिश्री ट्रेडिंग नावाच्या दुकानाचे शटर उचकटून ५ हजार रुपयांचे चिल्लर नाणे, ५ हजारांच्या नोटा, ५ हजारांचे दहा लिटर गोवर्धन तुपासह एकूण १८ हजारांचा माल लंपास केला. त्यांच्या दुकानाच्या शेजारील विमल भाऊसाहेब साळुंखे यांच्या कौशल्य कलेक्शनचे शटर उचकटून आतील १५०० रुपयांचे चिल्लर, १५ हजारांच्या नवीन २५ साड्या, ६ हजारांचे कपडे, असा एकूण २२ हजार ५०० रुपयांचा आणि राहुल अशोक दुशिंग यांचे सुंदर मेडिकल फोडून २६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी छावणीत गुन्हा नोंदविला.

पर्यटकाचा मोबाइल लांबविलामुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट फन्डामेंटल रिसर्च संस्थेतील प्रशासकीय अधिकारी तेजन तुषार शेट्टे या मैत्रिणीसह मुंबईहून देवदर्शनासाठी शहरात आल्या होत्या. खुलताबादला जाण्यासाठी निघाल्यानंतर रेल्वेस्थानक परिसरात हॉटेल न्यू भारती हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी थांबल्या. तेव्हा त्यांनी एक पशवी शेजारच्या खुर्चीवर ठेवली होती. तेथून एका महिलेने ती पिशवीच लंपास केली. त्यात २० हजार रुपये रोख रकमेसह दोन मोबाइल, आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रे, असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

पोलिसांकडून रात्रीचा गस्त होईना

दसऱ्यानंतर दिवाळी महोत्सवाला सुरुवात होत आहे. शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना रात्री पोलिसांची गस्त होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांना ठरवून दिलेल्या ठिकाणी गस्त न घालता एकाच ठिकाणी थांबून असतात. त्यामुळे चोरट्यांची दिवाळी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. ऐन दिवाळी गस्त व्यवस्थितपणे झाली नाही तर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद