शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चोराचा असाही ‘प्रामाणिकपणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:03 IST

पैठणमधील आश्चर्यकारक घटना : घरातून चोरलेले साडेपाच लाख रुपये आणून टाकले

पैठण : सेवानिवृत्त बँक व्यवस्थापकाच्या घरातून चोरीस गेलेले तब्बल पाच लाख ४८ हजार रुपये १५ दिवसानंतर चोरट्यांनी पुन्हा घरात आणून टाकल्याची घटना पैठण शहरात घडली.

या घटनेत एवढी मोठी रक्कम कुणी चोरली व ती रक्कम परत घरात आणून कुणी टाकली, हे अद्याप समोर आले नाही. सदरील रक्कम बँक व्यवस्थापकाच्या सालगड्याची होती. ती त्यांनी व्यवस्थांपकांकडे ठेवली होती. पुढे ती चोरीस गेली व पंधरा दिवसानंतर परत आली. या घटनाक्रमाने पोलीस बुचकळ्यात पडले आहेत. मुद्देमाल वसूल झाली असली तरी चोरी कुणी केली याचा तपास मात्र पोलिसांनी सुरू ठेवला असून लवकरच रक्कम चोर समोर येईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी व्यक्त केला.

२३ मार्च रोजी सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक भीमराव रंगनाथ गोरे (रा. रामनगर पैठण) यांनी घरात ठेवलेली ५ लाख ४८ हजार एवढी रक्कम चोरीस गेल्याचा अर्ज पोलीस ठाण्यात दिला. या अर्जात गोरे यांनी सदरील रक्कम त्यांचे शेतातील गडी मच्छिंद्र कदम (रा. आनंदपूर ता. पैठण) यांच्या मालकीची असल्याचे म्हटले आहे. मच्छिंद्र कदम यांना शेती विकत घ्यायची होती, परंतु सौदा तुटल्याने कदम यांनी रक्कम गोरे यांच्या घरीच ठेवली. सदरील रक्कम १५ ते २१ मार्च दरम्यान चोरीस गेली. याबाबत गोरे यांच्या घरात फर्निचरचे काम करणाऱ्या दोन कारागिरावर संशय व्यक्त केला होता.पोलीस ठाण्यात गोरे यांनी अर्ज दिल्यानंतर पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी अर्ज चौकशीसाठी ठेवून गतीने तपास सुरू केला. फर्निचरचे काम करणाºया कारागिरांनी चोरी केली नाही, हे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी फिर्यादीच्या घराची झडती घेतली. पोलिसांचा तपास सुरू असतानाच ३१ मार्च रोजी रक्कम चोरट्यांनी घरात आणून टाकल्याची खबर गोरे यांनी पोलीस निरीक्षक इमले यांना दिली.

पोलीसही आश्चर्यचकीतचोरलेले ५ लाख ४८ हजार रुपये एक रूपया खर्च न करता जसेच्या तसे पुन्हा घरात आणून टाकण्याची उपरती चोरट्यांना कशी झाली, या विचाराने सध्या पोलीस आश्चर्यचकीत झाले आहेत. मुद्देमाल परत मिळाला असला तरी चोर कोण हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. या प्रश्नावर पोलीस निरीक्षक इमले यांचे पथक सध्या काम करत असून या घटनेतील चोराचा चेहरा समोर येईल, असा विश्वास या पथकास आहे. दरम्यान, चोरीस गेलेले पाच लाख ४८ हजार रूपये चोराने परत आणून दिले, या घटनेची चर्चा शहरात मात्र जोरदार होत आहे.