शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच...

By admin | Updated: April 2, 2017 23:38 IST

उस्मानाबाद : शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी १ लाख ७२ हजार ३० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़

उस्मानाबाद : मागील काही महिन्यांपासून शहरात सुरू असलेला चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी १ लाख ७२ हजार ३० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना शहरातील आठवडी बाजार परिसरात घडली असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील आठवडी बाजार परिसरात नगर पालिकेच्या गाळ्यांमध्ये अनेक व्यवसायिकांचे दुकाने आहेत़ शहरातील गाझीपुरा भागात राहणारे अल्ताफ जमालोद्दीन शेख यांचेही या भागातील कॉम्प्लेक्समध्ये गाळा क्रमांक दोन मध्ये इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे़ त्यांचा भाऊ आशपाक शेख हा १ एप्रिल रोजी रात्री दुकान बंद करून गेला होता़ सकाळच्या सुमारास शेख यांचे दुकान चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले़ शेख यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता दुकानातील कॉपर वायरचे ३७ हजार ८४० रूपयांचे ८ बॉक्स, दुसऱ्या कंपनीच्या कॉपर वायरीचे २५ हजार २०० रूपयांचे ३ बॉक्स, १८ हजाराचे भंगार वायर, ७६०० रूपयांच्या ४० बुशिंग व रोख ४०० रूपये असा जवळपास ९८ हजार १६० रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे समोर आले़ तर शेख यांच्या दुकानाशेजारी असलेले अहमद हुसेन शेख यांचे एच़इंजिनिअरिंग दुकानही चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले़ शेख यांच्या दुकानातून १० हजार ८०० रूपयांचे कॉपर वायरचे बॉक्स, १४ हजार ८५० रूपयांचे तीन बॉक्स, ५ हजार ४०० रूपयांचा एक बॉक्स, १३ हजार ५०० रूपयांचे भंगार वायर असा जवळपास ४४ हजार ५५० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ तर याच भागात असलेले अमोल प्रकाश शेरकर यांचे किरणा दुकानही फोडल्याचे समोर आले़ शेरकर यांच्या दुकानातील ३७०० रूपयांचा मुगदाळीचा एक कट्टा, ३२०० रूपयांचे तांदळाचे दोन कट्टे, ७७०० रूपयांचे तेलाचे सात डब्बे, सहा हजार रूपयांचे सूर्यफुलाचे सात डब्बे, ११२० रूपये किंमतीचे चहापत्तीचे १४ बॉक्स, २४०० रूपयांचा शाबुदान्याचा एक कट्टा, गल्ल्यातील रोख २४०० रूपये असा जवळपास २९ हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन दुकाने फोडल्याने परिसरातील व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे़ घटनेनंतर स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर, पोनि डी़एम़शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली़ (प्रतिनिधी)