शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ जास्त मिळतात पैसे, आम्हाला का नाही?; मार्डचा सवाल

By संतोष हिरेमठ | Updated: February 7, 2024 06:53 IST

दिल्ली, यूपी, बिहारचे उदाहरण देत मार्डचा सवाल

संतोष हिरेमठलोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरतात. या ठिकाणी रुग्णसेवा देणारे निवासी डाॅक्टर हे तर रुग्णालयाचा कणा. मात्र, राज्यातील निवासी डाॅक्टरांना दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारपेक्षा कमी विद्यावेतन आहे. शिक्षणासाठी महाराष्ट्रात यायचे आणि कमी पैशांवर काम करायचे, अशी स्थिती असेल तर इतर राज्यांत गेलेले बरे, अशी भावना निवासी डॉक्टर व्यक्त करतात. 

विद्यावेतनासाठी संपाचा इशाराकेंद्रीय संस्थांप्रमाणे विद्यावेतन देणे, ते प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत जमा करणे, हाेस्टेलची पुरेशी व्यवस्था या तीन प्रमुख मागण्यांसाठी निवासी डाॅक्टरांनी ७ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर निवासी डाॅक्टरांशी संवाद साधण्यात आला.

निवासी डाॅक्टरांना किती वेतन? केंद्र सरकारची रुग्णालये : सुमारे १.२० लाख रुपयेएम्स दिल्ली - सुमारे १.१५ लाख ते १.२० लाख रुपयेबिहार - सुमारे १ लाख रुपये उत्तर प्रदेश - सुमारे १.१५ लाख ते १.२० लाख रुपये 

वैद्यकीय शिक्षणासाठी देशभरातील टाॅपर महाराष्ट्रात येतात. मात्र, येथे कमी विद्यावेतनावर काम करावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही विद्यावेतन वाढविले जात नाही. घरी पैसेही पाठविता येत नाही. त्यात चार-चार महिने विद्यावेतन मिळत नाही.  -डाॅ. अभिजित हेलगे, अध्यक्ष, मध्यवर्ती मार्ड संघटना

टॅग्स :doctorडॉक्टरMARDमार्डStrikeसंप