शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

"उद्योजकांच्या खाली बॉम्ब ठेऊन त्यांना पळवून लावण्याचे उद्योग 'त्यांनी' केले": मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 13:29 IST

‘गेल’ कंपनी मध्यप्रदेशात गेली, राज्यात किती उद्योग आले याची श्वेतपत्रिका काढा अशी विरोधकांनी मागणी केली आहे

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘गेल’ कंपनीने दाभोळ व छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिकमध्ये गुंतवणुकीचा विचार केला हाेता. सुमारे ५० हजार कोटींच्या गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या या कंपनीचा मोर्चा मध्यप्रदेशकडे वळविल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. उद्योजकांच्या खाली बॉम्ब ठेऊन त्यांना पळवून लावण्याचे उद्योग महाविकास आघाडीने केल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तर विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आम्ही उद्योजकांच्या बुडाखाली बॉम्ब ठेवले तर तुमचे उद्योगमंत्री सध्या काय करत आहेत, हे पहावे. तसेच तुमच्या काळात किती उद्योग राज्यात आले, त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली.

मुख्यमंत्र्यांचा दावा असा.....‘गेल’ कंपनी मध्यप्रदेशात गेली. दाभोळ किंवा संभाजीनगरमध्ये गुंतवणूक होणार होती. हा नेमका प्रकार काय, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांना आरोप करायला काय होतंय, आमचे सरकार सत्तेत येऊन दोनच महिने झालेले असतांना ‘वेदांता’वरून आरोप केले. दोन महिन्यांत वेदांता, फॉक्सकॉन कसे जाईल. आमच्या काळात राज्यात ६ लाख कोटींची गुंतवणूक आली. आम्हाला अजून दोन वर्ष पूर्ण झालेले नाहीत. १ कोटी ८७ लाखांची गुंतवणूक कामे प्रगतिपथावर आहेत. परदेशी गुंतवणुकीत राज्य क्रमांक एकवर आले आहे. महाविकास आघाडीच्या काळात चौथ्या क्रमांकावर राज्य होते. उद्योग फ्रेंडली स्टेट म्हणून राज्याची ओळख झाली आहे. राज्यात उगाच गुंतवणूक वाढत नाहीये, सुरक्षा आणि सवलती देत आहोत. पूर्वीचे सत्ताधारी उद्योजकांच्या खाली बॉम्ब लावायाचे. त्यामुळे उद्योग पळून जायचे.

विरोधकांशी टीका अशी....मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली, ते म्हणाले, ‘गेल’ कंपनीची गुंतवणूक दुसऱ्या राज्यात गेली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या काळात आलेल्या गुंतवणुकीची यादी जाहीर करावी. ‘गेल’चा ५० हजार कोटींचा प्रस्ताव होता. छत्रपती संभाजीनगर व दाभोळ येथे कंपनीने जागा पाहिली होती. राज्य सरकारची जबाबदारी होती, त्या कंपनीशी बोलणी करण्याची परंतु सरकारने काहीही केलेले नाही. ती सरकारी कंपनी आहे, त्यामुळे दिल्लीतील सरकारने महाराष्ट्रद्रोही भूमिका घेतल्यामुळे मध्यप्रदेशमध्ये गुंतवणूक गेली आहे. राज्यात काेणते उद्योग आले ते श्वेतपत्रिका काढून दाखवा. आम्ही बुडाखाली बॉम्ब ठेवतो मग तुमचे उद्योगमंत्री काय करतात ते पण पहा. मल्टिनॅशनल कंपन्यांना दिलेल्या जागा उद्योगमंत्री छोटे-छोटे प्लॉट पाडून विकत आहेत. आमच्यावर लंडन दौऱ्याचा आरोप करतात मग तुम्ही कोणत्या शेतकऱ्याला भेटला ते सांगावे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबाद