शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

कुख्यात इम्रानला पळविण्यासाठी औरंगाबादमध्ये आल्या होत्या ३ टोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:46 IST

कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहदी याला पोलिसांच्या तावडीतून सोडविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन टोळ्या सोमवारी (दि.२७) शहरात आल्या होत्या.

ठळक मुद्देपोलिसांचा बंदोबस्त पाहून इतर दोन टोळ्यांतील शार्पशूटरची हिंमत खचल्याने टळला मोठा अनर्थपोलिसांनी इम्रानला कडेकोट सुरक्षेत न्यायालयात आणल्याचे पाहून अन्य टोळ्यांनी पोलिसांवर चाल करण्याचे धाडस केले नाही.

औरंगाबाद : कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहदी याला पोलिसांच्या तावडीतून सोडविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन टोळ्या सोमवारी (दि.२७) शहरात आल्या होत्या. यापैकी मध्यप्रदेशातील एक टोळी पोलिसांच्या हाती लागली.  पोलिसांनी इम्रानला कडेकोट सुरक्षेत न्यायालयात आणल्याचे पाहून अन्य टोळ्यांनी पोलिसांवर चाल करण्याचे धाडस केले नाही, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखा आता अन्य टोळ्यांचा शोध घेत आहे. 

गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या खूनप्रकरणी आरोपी इम्रान मेहदीसह त्याच्या ८ साथीदारांना सोमवारी न्यायालयाने जन्मठेपेसह दंडाची शिक्षा ठोठावली. इम्रान आणि त्याच्या साथीदारांना कारागृहातून न्यायालयात ने-आण करण्यासाठी केवळ सहा पोलिसांचा बंदोबस्त असायचा. ही बाब त्याच्या साथीदारांनी हेरली. पोलिसांवर गोळीबार करून त्याला पळवून नेण्याचा कट कॅप्टन नावाच्या आरोपीने रचला. त्यानुसार मध्यप्रदेशातील शार्पशूटरसह सात जणांची टोळी औरंगाबादेत आली होती. यासोबतच मुंबई आणि अन्य एका जिल्ह्यातील सशस्त्र टोळीही आली होती. तीन टोळ्यांसाठी ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ अशा तीन योजना गुन्हेगारांनी तयार केल्या होत्या. मध्यप्रदेशातील टोळीला प्लॅन ‘ए’, पहिली टोळीची योजना फसल्यास दुसरी टोळी प्लॅन ‘बी’ची अंमलबजावणी करणार होती. दुसऱ्या टोळीलाही यश न मिळाल्यास प्लॅन ‘सी’ची अंमलबजावणी तिसरी टोळी करणार होती. 

इम्रान मेहदीला पळवून नेण्याच्या कटाची माहिती खबऱ्याने २३ आॅगस्ट रोजीच गुन्हे शाखेला दिली आणि पोलीस सतर्क झाले. २४ आॅगस्टला इम्रानला शिक्षा ठोठावली जाणार होती. एवढ्या कमी वेळेत आरोपींना पकडणे शक्य नसल्याचे लक्षात येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपींच्या शिक्षेची तारीख पुढे ढकलण्याची विनंती न्यायालयास केली. त्यानंतर २७ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एकत्र बसून इम्रान मेहदी आणि त्याच्या टोळीला कारागृहातून न्यायालयात सुरक्षित नेण्या-आणण्याची तयारी केली. त्यांच्या जाण्या-येण्याचा मार्ग आणि सुरक्षा व्यवस्थेचा एक दिवस आधीच सरावही केला. खबऱ्यांनाही कामाला लावले. सोमवारी सकाळीच मध्यप्रदेशातून आलेल्या टोळीची माहिती मिळाल्यानंतर पाठलाग करून नारेगाव चौक ाजवळ पोलिसांनी सशस्त्र टोळीच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईची माहिती अन्य टोळ्यांना कळली; मात्र पोलिसांचा बंदोबस्त पाहून अन्य टोळ्यांनी सतर्क पोलिसांवर हल्ला करण्याचे धाडस केले नाही. 

जेल ते दिल्ली गेट दरम्यान पोलिसांवर हल्ल्याचा कटसूत्रांनी सांगितले की, मध्यप्रदेशातून आलेल्या शार्पशूटर गँगने इम्रान मेहदीला सोडविण्यासाठी रचलेल्या कटानुसार ते हर्सूल जेल ते दिल्ली गेट दरम्यान पोलिसांवर गोळीबार करणार होते. त्यासाठी त्यांनी या मार्गाची रेकी केली होती. २७ रोजी रेकी करीत ते दिल्लीगेट येथे थांबले होते. त्याचवेळी तेथे असलेल्या साध्या वेशातील गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. एवढेच नव्हे, तर तेथे पोलीस असल्याचे आरोपींच्या लक्षात आले होते. यामुळे पोलिसांना चकमा देण्याच्या उद्देशाने आरोपी तेथून लगेच कटकटगेटच्या दिशेने आणि नंतर नारेगाव येथे गेले होते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक