शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राजे, महाराजे अनेक झाले पण छत्रपती होणारे शिवाजी पहिलेच : रवींद्र पाटील

By राम शिनगारे | Updated: June 6, 2023 17:34 IST

विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष व्याख्यान

छत्रपती संभाजीनगर : इतिहासासह पुराणकाळात अनेक राजे, महाराजे होऊन गेले. परंतु छत्रपती होणारे शिवाजी महाराज हे पहिलेच होय. राज्याभिषेकाची पायाभरणी ३० वर्षांपासून सुरू होती. त्याचा परिपाक म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवचरित्रकार रवींद्र पाटील यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महात्मा फुले सभागृहात ’सांप्रत काळामध्ये छत्रपतींच्या राज्यभिषेकाची आवश्कता’ या विषयावर मंगळवारी विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर कुलसचीव डॉ.भगवान साखळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, डॉ. योगिता होके पाटील, संचालक डॉ. राजेश रगडे यांची उपस्थिती होती.

व्याख्याते पाटील म्हणाले, ज्या काळात अन्याय, अत्याचारांनी परिसीमा गाठली होती. साधे बोलणेही कठिण झाले होते. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प केला. त्यासाठी राजमाता जिजाऊ यांची प्रेरणा होती. ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला, मात्र त्यापूर्वी ३० वर्ष या राज्याभिषेकाचीच पायाभरणी करण्यात येत होती. देशाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले, मात्र पहिले छत्रपती शिवाजी महाराजच होच होते. साडेतीनशे वर्षांनंतर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा महिमा टिकून आहे. त्या शिवराज्यभिषेकाचा महिमा असेतूचंद्र राहील, असेही पाटील यांनी सांगितले.

कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी ’शिवराज्यांभिषेक’चे ऐतिहासिक महत्व सांगितले. प्रा.पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.राजेश रगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.मुस्तजिब खान, प्रदीपकुमार जाधव यांच्यासह इतर उपस्थित होते.

प्रत्येकजण शिवाजी महाराजांचा मावळाअध्यक्षीय समारोपात प्रकुलगुरु डॉ. शिरसाठ म्हणाले, शिवारायांनी मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची निर्मिती केली. त्याच मावळ्यांपैकी आपणही एक आहोत. महाराजांच्या सर्व पैलुंचा अभ्यास झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज