शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वास्तुशास्त्र अभ्यासक्रमावरून विद्यापीठाच्या अधिसभेत जोरदार खडाजंगी

By विजय सरवदे | Updated: July 27, 2023 17:03 IST

अतार्किक, भंपक अभ्यासक्रम सुरू करून विद्यापीठाचा पुरोगामी चेहरा पुसण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर खपवून घेणार नाही.

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत आराखड्यात वास्तुशास्त्र अभ्यासक्रम समावेश करण्याच्या मुद्द्यावरून अधिसभेत जोरदार खडाजंगी झाली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराचा वारसा लाभलेल्या या विद्यापीठात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा अभ्यासक्रम रद्द करावा, सदस्यांची ही मागणी लक्षात घेऊन अखेर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना हा विषय बृहत आराखड्यातून वगळण्याचा निर्णय घ्यावा लागला.

सन २०२४ ते २०२९ या पाच वर्षांसाठी तयार करण्यात आलेला बृहत आराखडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मान्यतेस्तव बुधवारी अधिसभेच्या पटलावर ठेवला. तेव्हा मानव्य विद्याशाखेंतर्गत बृहत आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ‘वास्तुशास्त्र व न्युमेरॉलॉजी’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमास सुरुवातीलाच प्रा. सुनील मगरे, डॉ. शंकर अंभोरे, डॉ. नरेंद्र काळे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. संजय कांबळे यांनी कडाडून विरोध केला. विद्यापीठाने औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यांसाठी हा अभ्यासक्रम बृहत आराखड्यात प्रस्तावित केला होता. सदस्यांनी एकत्रितपणे या अभ्यासक्रमास कडाडून विरोध केला.

यावेळी सदस्यांनी अंधश्रद्धेला उत्तेजन देण्याचा विद्यापीठाचा हेतू आहे का. अशा प्रकारचे अतार्किक, भंपक अभ्यासक्रम सुरू करून विद्यापीठाचा पुरोगामी चेहरा पुसण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर खपवून घेणार नाही. प्रवेशासाठी कोणती पदवी घेणारे विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून हा अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला. अध्यापनासाठी प्राध्यापकांचा निकष काय लावणार, याचा सिलॅबस काय असेल, असे एक नव्हे असंख्य प्रश्न उपस्थित करून सभागृह दणाणून सोडले. तेव्हा कुलगुरू डॉ. येवले यांनी सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम वगळण्याचा निर्णय घेतला.

६६० नवीन अभ्यासक्रम प्रस्तावितबृहत आराखड्यात सुमारे ६६० नवीन अभ्यासक्रम प्रस्तावित करण्यात आले असून यात ८० टक्के कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद १९४, जालना १५२, बीड १७४ व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी १४० अभ्यासक्रमांचा प्रस्ताव आहे. विद्यापीठाचा मुख्य परिसर व उस्मानाबाद उपपरिसर या ठिकाणी जवळपास ४० अभ्यासक्रम प्रस्तावित आहेत. यामध्ये जैवतंत्रज्ञान, फॅशन डिझाईन, शैक्षणिक व्यवस्थापन, उद्योजकता विकास, रोबोटिक सायन्स, जिम ट्रेनिंग ॲण्ड हेल्थ मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझनेस, स्पेस टेक्नॉलॉजी, पर्यटन प्रशासन आदी विषयांचा समावेश आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण