शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या पंचांगात ‘पेट’साठी मुहूर्तच नाही; संशोधनासाठी विद्यार्थ्यांची उत्कंठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 13:10 IST

सन २०१६ मध्ये ‘पेट’ झाल्यानंतर आजपर्यंत या परीक्षेला मुहूर्त सापडलेला नाही.

ठळक मुद्देनवीन वर्षात परीक्षा घेण्याचे प्रशासनाचे संकेतसाधारणपणे जानेवारी महिन्यात ‘पेट’ घेण्याचा विचार

औरंगाबाद : मागील चार वर्षांपासून रखडलेली पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) चालू वर्षात देखील होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, संशोधनासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 

सन २०१६ मध्ये ‘पेट’ झाल्यानंतर आजपर्यंत या परीक्षेला मुहूर्त सापडलेला नाही. यासंदर्भात प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की, ‘पेट’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या व उपलब्ध गाईडकडे संशोधन करणाऱ्या विद्यार्थी संख्येमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे नव्याने ‘पेट’ घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रांगेत ठेवून त्यांना किती दिवस प्रतीक्षा करण्यास भाग पाडायचे, हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मागील चार वर्षांत ‘पेट’ घेणे शक्य झाले नाही.

तथापि, विद्यापीठासमोर हा प्रश्न निर्माण झालेला असला, तर मग नव्याने नेट- सेट किंवा पदव्युत्तर पदवी घेऊन संशोधन करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचे, हाही तेवढाच महत्वाचा व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. विद्यापीठ प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या सुरू असलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम अंतिम सत्राच्या परीक्षा आटोपल्यावर लगेच निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यानंतर प्रवेशाची लगबग सुरू होईल. त्यामुळे ‘पेट’ घेण्याचे नियोजन अद्याप हाती घेण्यात आलेले नाही. साधारणपणे जानेवारी महिन्यात ‘पेट’ घेण्याचा विद्यापीठाचा विचार सुरू आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीEducationशिक्षण