शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:33 IST

कोल्हाटी भातु समाजातर्फे पंढरपूर येथील वैष्णोदेवी उद्यानात रविवारी राज्यस्तरीय कोल्हाटी समाज, वधु-वर परिचय व गुण गौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

वाळूज महानगर : शिक्षणाअभावी कोल्हाटी समाज विकासापासून कोसो दूर आहे. समाजाची प्रगती करायची असेल, सन्मानाचे स्थान मिळवून द्यायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकांनी शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणासाठी मुलांना पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत पंढरपूर येथे रविवारी (दि.१७) आयोजित कोल्हाटी समाजाच्या राज्यस्तरीय समाज, वधू-वर परिचय व गुणगौरव सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.विखुरलेले कोल्हाटी समाजबांधव एकत्र यावेत, एकमेकांची ओळख व्हावी. तसेच समाजाची पुढील दिशा ठरविण्यासाठी औरंगाबाद जिल्हा कोल्हाटी भातु समाजातर्फे पंढरपूर येथील वैष्णोदेवी उद्यानात रविवारी राज्यस्तरीय कोल्हाटी समाज, वधु-वर परिचय व गुण गौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

जयराम मुसळे म्हणाले की, परिस्थितीनुसार समाजाने बदलणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व सांगितले. त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार अंमलात आणा. पूर्वी शिक्षण नसल्याने समाजाची वाईट अवस्था होती. पण आता शिक्षणाची सोय झाली असून, प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणामुळे इतर समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यामुळे समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. असे सांगितले.

प्रिया काळे यांनी शिक्षण घेतल्या शिवाय समाजाचा विकास नाही असे सांगत शिक्षणासाठी आई-वडिलांना मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे सांगितले. यावेळी प्रभाकर गंगावणे, युवराज गांगवे, अविष्कार गंगावणे, राहुल पवार आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. १०३ वरांनी तर ४३ वधुंनी विवाहासाठी नोंदणी केली.

कार्यक्रमाला आदित्य जाधव, प्रविण भोसले, श्रीकृष्ण काळे, उमाकांत पवार, गणेश जाधव, नंदकिशोर मुसळे, भाऊलाल काळे, लता मुसळे, काजल काळे, नारायण काळे, एकनाथ काळे, सुनिल काळे, रघुनाथ जाधव, सोमिनाथ काळे, मदन काळे, दिलीप पवार आदींसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चाफेश्वर गंगावणे यांनी केले. तर संतोष चंदन यांनी आभार मानले.

टॅग्स :WalujवाळूजSocialसामाजिक