शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील एकाही घोषणेची पूर्तता नाही; शहर कागदावरच दिसतेय सुंदर, स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 14:23 IST

फेब्रुवारी महिन्यात सुधारित अर्थसंकल्प प्रशासनाला सादर करावा लागेल.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात चक्क ५० टक्क्यांहून अधिक कपातीची नामुष्की१८६४ कोटींचा अर्थसंकल्प ९०० कोटींवर येणार

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी मिळून २०१८-१९ या आर्थिक वर्षात १८६४ कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला होता. दहा महिने उलटल्यानंतरही अर्थसंकल्पातील ठोस विकासकामांचा श्रीगणेशाच झालेला नाही. फेब्रुवारी महिन्यात सुधारित अर्थसंकल्प प्रशासनाला सादर करावा लागेल. यामध्ये अर्थसंकल्प थेट ९०० कोटींवर आणण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

शहराचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ साधत अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात येतील. शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी अनेक योजनांचा समावेश करण्यात आला होता. मागील दहा महिन्यांत अर्थसंकल्पातील एकाही घोषणेवर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी काम केले नाही.

कल्याणकारी योजनाही प्रशासनाकडून बेदखल- २० कोटी रुपये - महानगरपालिकेतर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजना, स्व. सौ. मीनाताई ठाकरे कन्या सुरक्षा मुदतठेव योजना, पदमपुरा येथे राखीव जागेवर नियोजित प्रशासकीय इमारत, मनपाचे विश्रामगृह, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह, गरवारे स्वीमिंग पुलाचे काम करणे व क्रीडा संकुल विकास  - ५ कोटी रुपये - ज्योतीनगर येथील जलतरण तलाव पुन्हा कार्यान्वित करणे, महावीर संशोधन केंद्र उभारणे - २ कोटी रुपये - मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाचे संतसृष्टी उभारणीसाठी वापरणे.- वस्तुस्थिती : यातील एकही योजना मागील दहा महिन्यांत कार्यान्वित होऊ शकली नाही. विविध आढावा बैठकांमध्ये योजना सुरू करा म्हणून सत्ताधाऱ्यांकडून पाठपुरावा करण्यात आला. प्रशासनाने काहीच दखल घेतली नाही.

अर्थसंकल्पातील ठळक घोषणा- शहागंज येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे व चमनचे सुशोभीकरण करणे,- महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारणे,- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद, - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, अमरप्रीत चौकात शिल्प उभारणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाचे सुशोभीकरण करणे.- वस्तुस्थिती : शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यासाठी अजून निविदाच काढली नाही. महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी लवकरच निविदा काढणार आदी कामांसाठी महापौरांकडून जोरदार पाठपुरावा सुरू आहे.

आयुक्तांसाठी १०८ कोटींची तरतूद- १०८ कोटी रुपये - महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात विविध विकासकामांसाठी तरतूद करायला लावली. - १० कोटी -लोकसहभाग- १० कोटी - प्राणी कल्याण- १३ कोटी - घनकचरा व्यवस्थापन- ३० कोटी -हेरिटेजसाठी - २० कोटी - क्रीडा विकास- २५ कोटी - शिक्षण आणि आरोग्य- १०८ कोटी - एकूण तरतूद केलीवस्तुस्थिती : शहरातील विविध दरवाजांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. काही शाळांची डागडुजी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. साधारण ३ ते ५ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद सध्या सुरू आहे.

उद्याने आणि बगिचे : - ५ कोटी रुपयांची तरतूद -४मनोरंजन पार्क, नाना-नानी, आजी-आजोबांसाठी पार्क, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, रोझ गार्डन नागरिकांसाठी खुले करणे, दिव्यांगासाठी उद्यान विकास करणे  ४सलीम अली सरोवर विकसित करणे, वृक्ष लागवड-संवर्धन, जांभूळवन, हर्सूल येथे आॅक्सिजन पार्क उभारणे.- रस्ते, नगररचना - बौद्ध लेणी मार्ग विकसित करणे २ कोटीची तरतूद, डिफर्ट पेमेंटच्या धर्तीवर रस्ते विकसित करणे १०० कोटींची तरतूद, चार आदर्श रस्ते विकसित करणे १५ कोटींची तरतूद, विकास योजना रस्त्यांचे लेन मार्किंग करणे, जुना शहर विकास आराखडा सुधारित करणे, रेल्वेस्टेशन एमआयडीसी ते बीड बायपास जोडणारा पूल उभारण्यासाठी मनपाचा हिस्सा टाकणे.- वस्तुस्थिती : बौद्ध लेणीचा रस्ता अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाने गुळगुळीत केला. डिफर्ट पेमेंट पद्धतीवर १८ रस्त्यांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. उर्वरित कामांसाठी अंदाजपत्रकच तयार नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरBudgetअर्थसंकल्प 2023Municipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद