शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गद्दार कोण, याची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाच नाही; पण सत्तारांना झुकते माप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 13:00 IST

गटबाजीच्या राजकारणात यापुढे जुन्या नेत्यांना सहन न करण्याचे ‘मातोश्री’ वरून संकेत

ठळक मुद्देअब्दुल सत्तार विरुद्ध चंद्रकांत खैरे वाद मुख्यमंत्र्यांनी कुणाचेही ऐकले नाही

औरंगाबाद :  राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि त्यांच्यावर गद्दारीचा आरोप करणाऱ्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे या दोघांचेही कुठलेही स्पष्टीकरण मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतले नाही मात्र त्याचवेळी नव्यांना उभारी देण्याचा भाग म्हणून अब्दुल सत्तार यांनाच झुकते माप दिल्याची माहिती मिळाली. 

शिवसेनेला आता पक्षात नवीन काम करणाऱ्यांना उभारी द्यायची आहे.  रामदास कदम, दिवाकर रावते यांच्यासारखी मंडळी मंत्रिमंडळाबाहेर ठेवल्यामुळे पक्षांतर्गत मी आणि मीच असे राजकारण यापुढे चालणार नाही, असा इशारा  ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे दिला आहे. परिणामी आता संघटनेत होणाऱ्या गटबाजीच्या वादात यापुढे जुन्या नेत्यांना फार सहन केले जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.  अब्दुल सत्तार आणि खैरे  यांच्यातील गद्दार कोण आणि सुभेदार कोण या वादात मुख्यमंत्र्यांनी ‘ मातोश्री’वर कुणाचेही  ऐकून न घेता एकत्रित काम करण्याचा सल्ला दोघांनाही दिला.  या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री सत्तार यांच्या बाजूनेच असल्याचे दिसते. ज्या तावातावाने खैरे यांनी सत्तार यांना मातोश्रीवर पाऊल ठेवू देण्यास विरोध दर्शविला होता. त्या सत्तार यांना अखेर मातोश्रीवर प्रवेश मिळालाच. शिवसेना नेत्याच्या इशाऱ्याकडे  पक्षप्रमुखांनी  दुर्लक्षच केल्याचे दिसले. दरम्यान पक्षप्रमुखांनी आदेश दिल्याने सध्या वादावर पडदा पडला असला तरी जिल्ह्याच्या राजकारणात सत्तार आणि खैरे असा संघर्ष यापुढेही दिसणार आहे. 

डोणगावकर दाम्पत्यांचे पुनर्वसन ?माजी जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, उपजिल्हाप्रमुख कृष्णा डोणगावकर यांची ४ जानेवारी रोजी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जि. प. निवडणुकीत केलेली बंडखोरी या दाम्पत्याला भोवली आहे. पक्षातील सूत्रांनी सांगितले की, २१ जानेवारी रोजी जि. प. निवडणुकीबाबत औरंगाबाद खंडपीठात सुनावणी आहे. त्यानंतर डोणगावकर दाम्पत्यास पुन्हा पक्षात घेण्याबाबत विचार होईल.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAbdul Sattarअब्दुल सत्तारShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे