शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शववाहिनी नसल्याने औरंगाबादच्या घाटीत मृतदेहाची होतेय अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:13 IST

घाटी रुग्णालयात मृत्यूनंतर एकप्रकारे मृतदेहाचा छळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या अनेक रुग्णांचे शवविच्छेदन करावे लागते; परंतु शववाहिनीअभावी मेडिसिन विभागापासून शवविच्छेदनगृहापर्यंत मृतदेह स्ट्रेचरवरूनच नेण्याची कसरत दररोज करावी लागते.

ठळक मुद्देकर्मचारी गायब : मेडिसिन विभागापासून शवविच्छेदनगृहापर्यंत स्ट्रेचरवरून न्यावा लागतो मृतदेह; नातेवाईकांची होते अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात मृत्यूनंतर एकप्रकारे मृतदेहाचा छळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या अनेक रुग्णांचे शवविच्छेदन करावे लागते; परंतु शववाहिनीअभावी मेडिसिन विभागापासून शवविच्छेदनगृहापर्यंत मृतदेह स्ट्रेचरवरूनच नेण्याची कसरत दररोज करावी लागते. अशावेळी नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.रुग्णालयामध्ये उपचार घेताना निधन झालेल्या रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिनीचा वापर होतो. यामध्ये विभागातून शवविच्छेदनगृहापर्यंत तसेच शवविच्छेदनगृहापासून घरापर्यंत सेवा महत्त्वपूर्ण ठरते. घाटीतील अपघात विभागापासून शवविच्छेदनगृहाचे अंतर अधिक नाही; परंतु मेडिसिन विभाग रुग्णालयाच्या दुसऱ्या टोकावर आहे.या ठिकाणाहून मृतदेह शवविच्छेदनगृहापर्यंत नेण्यासाठी कर्मचारी आणि नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. घाटी रुग्णालयास प्राप्त झालेल्या शववाहिनीचा वापर आजघडीला रुग्णवाहिका म्हणून होत आहे. परिणामी, शववाहिनीअभावी थेट स्ट्रेचरवरून मृतदेह ओढत नेण्याशिवाय पर्याय नाही. अनेकदा तर कर्मचाºयांअभावी नातेवाईकांनाच मृतदेह घेऊन जावा लागतो.कर्मचारी सोबत येत नसल्याने शवविच्छेदनगृह कुठे आहे, याची विचारणा करण्याचीही वेळ नातेवाईकांवर ओढावते. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने नातेवाईक आधीच दु:खात असतात. अशावेळी नातेवाईकांच्या वेदना कमी करण्याऐवजी जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होतो. घाटीत जागोजागी रुग्णवाहिका उभ्या असतात. त्यामुळे शवविच्छेदनगृहापर्यंत मृतदेह नेण्यासाठी नातेवाईकांकडून विचारणा केली जाते. रुग्णवाहिकांचा नातेवाईकांना आधार मिळतो; परंतु त्यासाठी रक्कम मोजण्याची वेळ नातेवाईकांवर येत आहे.ऊन, पावसाचा माराशववाहिनीअभावी ऊन, पावसाचा मारा सहन करीत मृतदेह नेण्याची वेळ येत आहे. हा एकप्रकारे छळ असल्याचीच ओरड नातेवाईकांकडून होत आहे. मेडिसिन विभागापासून शवविच्छेदनगृहापर्यंत शव नेण्यासाठी न्यायवैद्यकशास्त्र विभागाने घाटी प्रशासनाकडे शववाहिनीची मागणी केली आहे.लवकरच प्रस्ताव देणारस्ट्रेचरवरूनच मृतदेह नेले जात आहेत; परंतु शववाहिनीसाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयास प्रस्ताव देण्यात येणार आहे. लवकरच शववाहिनी उपलब्ध होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे म्हणाले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू