शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

खगोलशास्त्राबद्दल जेवढी अंधश्रद्धा आहे तेवढी कोणत्याही शास्त्रात नाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:19 IST

खगोलशास्त्राबद्दल जेवढी अंधश्रद्धा आहे तेवढी कोणत्याही शास्त्रात नाही, असे स्पष्ट विचार खगोलशास्त्राचे अभ्यासक व पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी येथे मांडले. 

ठळक मुद्देखगोलशास्त्राकडे विज्ञानाचे शास्त्र म्हणून पाहिले पाहिजे, यावर त्यांनी आपल्या व्याख्यानात भर दिला.

औरंगाबाद : धूमकेतूमधून पृथ्वी गेल्यास सर्व माणसे मरतात, उल्का दिसली तर मनातील मनोकामना पूर्ण होतात किंवा चंद्राभोवती खळे निर्माण झाले तर अप्रिय घटना घडते, या अंधश्रद्धा आहेत. तसेच ग्रहांचा व अंगठीतील खड्यांचा काहीच संबंध नाही. मात्र, खगोलशास्त्राबद्दल जेवढी अंधश्रद्धा आहे तेवढी कोणत्याही शास्त्रात नाही, असे स्पष्ट विचार खगोलशास्त्राचे अभ्यासक व पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी येथे मांडले. 

एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लब औैरंगाबादच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  सोमण यांच्या उदाहरणांसह देण्यात येणाऱ्या शैलीमुळे व्याख्यान रंगले. विविध उदाहरणे देत दा.कृ. सोमण यांनी खगोलप्रेमींना  खगोलशास्त्राकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. खगोलशास्त्राकडे विज्ञानाचे शास्त्र म्हणून पाहिले पाहिजे, यावर त्यांनी आपल्या व्याख्यानात भर दिला.

त्यांनी सांगितले की, दर ३३ वर्षांनी सिंह राशीतून १७ नोव्हेंबर रोजी मोठा उल्का वर्षाव होत असतो. पृथ्वी त्या दिवशी ‘टेंपल टटल’ धूमकेतूच्या मार्गातून भ्रमण करते. १७ नोव्हेंबर २००० रोजी तासाला ४०० उल्का पृथ्वीवर पडल्या होत्या. आता १७ नोव्हेंबर २०३३ रोजी रात्री असा मोठा उल्का वर्षाव होणार आहे. स्वीफ्ट धूमकेतू १४ आॅगस्ट २१२६ रोजी पृथ्वीवर आदळणार अशी बातमी होती. मात्र, आता शास्त्रज्ञांनी सांगितले की, तो पृथ्वीपासून २ कोटी २० लाख कि.मी. अंतरावरून जाणार आहे. यामुळे घाबरण्याचे कारण नाही. १६ डिसेंबर २०१९ रोजी दक्षिण भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.

मात्र, औरंगाबादेत हे सूर्यग्रहण खंडग्रास दिसणार असल्याचे सांगून सोमण पुढे म्हणाले की, खगोलशास्त्रासारखा आवडीचा छंद कोणताही नाही. पुस्तक वाचावे लागते तर आकाश सदैव उघडे असते. रात्रीच्या वेळी आकाशातील नक्षत्र बघण्यास काहीच खर्च येत नाही. लहान असो वा ज्येष्ठ सर्वांनी आकाश दर्शन करावे, खगोलशास्त्राचे तेवढे ज्ञान समाजात निर्माण होईल. त्यामुळे अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होईल, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी एमजीएमचे विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंैधकर यांची उपस्थिती होती.  भाग्यश्री केढे यांनी सूत्रसंचालन    केले.  

पंचांग हे आकाशाचे वेळापत्रक दा.कृ. सोमण यांनी सांगितले की, रेल्वेचे जसे वेळापत्रक असते तसेच पंचांग हे आकाशाचे वेळापत्रक आहे. त्यापलीकडे काही नाही. त्यांनी सांगितले की, राशीभविष्य बघण्यापेक्षा आपले भविष्य स्वत:च्या मनगटाच्या जोरावर घडविणे आवश्यक  आहे.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषmgm campusएमजीएम परिसरEducationशिक्षण