शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

...तर नगरसेवकांची संख्या जाईल १५० पर्यंत; इच्छुक उमेदवार पुन्हा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 12:24 IST

२०१५ मध्ये ११५ वॉर्डांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.

ठळक मुद्देराज्य शासनाकडून नगरसेवक वाढीच्या हालचाली लोकसंख्येनुसार संख्या जाईल १५० पर्यंत

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : राज्य सरकारने महापालिकांमधील ( Aurangabad Municipal Corporation ) नगरसेवकांची संख्या वाढविण्याच्या हालचालींना वेग दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली असून, लवकरच या संदर्भात मंत्रिमंडळासमोर प्रस्तावही येणार असल्याचे जाणती मंडळी सांगते. मंत्रिमंडळाने नगरसेवक वाढविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि औरंगाबाद महापालिकेलाही तो लागू केला, तर शहरातील नगरसेवकांची संख्या लोकसंख्येनुसार १५० पर्यंत वाढू शकेल (number of corporators will go up to 150) . त्यामुळे प्रभाग रचनेचा प्रारूप आराखड्याचे काम पुन्हा रेंगाळण्याची चिन्हे असल्यामुळे इच्छुक उमेदवार हवालदिल झाले आहेत.

लोकसंख्येच्या निकषावर नगरसेवकांची संख्या ठरविली जाते. औरंगाबाद महापालिकेला ‘क’ दर्जा देण्यात आलेला आहे. २०१५ मध्ये ११५ वॉर्डांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. एप्रिल २०१९ मध्ये महापालिकेचा कार्यकाल संपला. आता राज्य निवडणूक आयोगाने प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने कामही सुरू केले आहे. नगरसेवकांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाली. सोशल मीडियावर यासंदर्भात वेगवेगळे मतप्रवाहसुद्धा सुरू झाले.

लोकसंख्येचा निकष महत्वाचा‘लोकमत’ने यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता सूत्रांनी सांगितले की, नगरसेवकांची संख्या वाढवायची असेल तर महापालिका अधिनियम कलम ५ मध्ये राज्य शासनाला बदल करावा लागेल. अचानक नगरसेवकांची संख्या वाढविता येत नाही. महापालिकेचा प्रवर्ग आणि लोकसंख्येच्या निकषानुसार नगरसेवकांची संख्या ठरते. शहराच्या १० लाख लोकसंख्येसाठी १०० आणि त्यावर २५ हजार लोकसंख्येसाठी एक नगरसेवक ठरविण्यात आला आहे. ‘क’वर्ग महापालिकेसाठी संख्येची कमाल मर्यादा १२५ आहे. कायद्यात बदल करताना किती हजारांवर एक नगरसेवक ठेवणार, याचा निकष शासनाला ठरवावा लागेल. त्यानंतर या निर्णयाचे कायद्यात रूपांतर होऊ शकेल. अर्थात, या प्रक्रियेला वेळही लागू शकतो. सध्या ११५ नगरसेवकांच्या निकषावर निवडणूकीचे काम सुरू आहे.

निकष बदलावे लागतीलमहापालिका अधिनियम कलम ५ मधील २-अ मध्ये लोकसंख्येचे निकष दिले आहेत. नगरसेवकांची संख्या वाढविण्यासाठी कायद्यात बदल आवश्यक असतो. कमीत कमी लोकसंख्येला किती आणि जास्तीत जास्त लोकसंख्येला किती नगरसेवक असावेत हे अधियमात नमूद केलेले आहे.- एम.ए. पठाण, निवृत्त नगरसचिव, मनपा.

काय म्हणतो कायदा३ ते ६ लाख लोकसंख्या - किमान ६५, जास्तीत जास्त ८५ नगरसेवक६ ते १२ लाख लोकसंख्या - किमान ८५, जास्तीत जास्त ११५१२ ते २४ लाख लोकसंख्या- ११५ ते १५१२४ ते ३० लाख लोकसंख्या- १५१ ते १६१३० लाखांपेक्षा अधिक- १६१ ते १७५

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक