शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

...तर चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध विधानसभा लढवणार : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 2:45 PM

चंद्रकांत पाटील हे राधानगरी, कोल्हापूर शहर व चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा विचार करीत आहेत.

ठळक मुद्देविधानसभा लढण्याची शेट्टी यांची तयारी

औरंगाबाद : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना स्वत:चा मतदारसंघ नाही, त्यामुळे ते मतदारसंघाची चाचपणी करीत आहेत. ते जर ग्रामीण भागातील मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले तर मी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले. 

चंद्रकांत पाटील हे राधानगरी, कोल्हापूर शहर व चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा विचार करीत आहेत. त्याविषयी पत्रकारांनी राजू शेट्टी यांना विचारले असता त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली. तसेच ते जर ग्रामीण भागातून लढणार असतील तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार असेही जाहीर केले. सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चाप्रसंगी माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. महापोर्टल बंद करून सर्व भरती एमपीएससीद्वारे सुरू करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. काही जिल्ह्यांत एक, दोन तर काही जिल्ह्यांत काहीच पदांची भरती नाही, अशा प्रकारे सरकारने युवकांची चेष्टाच केली आहे. हजारो पदे रिक्त असताना सरकार मेगा भरती का काढत नाही, असा सवाल शेट्टी यांनी केला. 

‘महापोर्टल’मधून ‘महाव्यापमं’सारखे घोटाळेमहापोर्टलद्वारे नोकर भरतीमध्ये ‘महाव्यापमं’सारखे घोटाळ्याचे प्रकार होत असूनही, सरकारचा याद्वारे भरती करण्याचा अट्टहास का, यातील भ्रष्टाचाराच्या वाटण्या कोणाकोणापर्यंत, त्याचे भागीदार कोणकोण आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. हे घोटाळे करणारे भाजपचे लोक आहेत, त्यांना वाचविले जात आहे, असा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर निशाणा साधला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलRaju Shettyराजू शेट्टीvidhan sabhaविधानसभा