शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड अवैध गौणखनिज उत्खनन : ...तर मुख्य सचिवांविरुद्ध कारवाईचे हायकोर्टाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:36 IST

कन्नड तालुक्यातील ६२१ कोटींचे अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरण

ठळक मुद्दे फौजदारी कार्यवाहीबाबत कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही गुन्हा दाखल करण्यासाठी खंडपीठाने ११ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील ६२१ कोटींच्या अवैध गौणखनिज उत्खननप्रकरणी कारवाई करण्याची शासनाने तयारी दाखविली नाही, तर प्रसंगी राज्याच्या मुख्य सचिवांविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. के. के. सोनवणे यांच्या खंडपीठाने दिले.

राज्य शासनाच्या वतीने यासंदर्भात फौजदारी कार्यवाहीबाबत कुठलेही पाऊल उचलण्यात आले नसल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे असून, केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे.  कन्नड तालुक्यातील तीन तलावांमधील अवैध गौणखनिज उत्खननप्रकरणी दाखल याचिका सुनावणीस आली असता खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले. दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी, तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी खंडपीठाने ११ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. गौणखनिज चोरीप्रकरणी दाखल फौजदारी याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने दिलेल्या आदेशांचे पालन राज्य शासनाने केले नसल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे. परवानगीशिवाय आणि रॉयल्टीची भरपाई केल्याशिवाय सार्वजनिक मालमत्तेचे उत्खनन केल्याचे दिसून येते. प्रकरणात नोटीस बजावणे, दंड लावणे, रॉयल्टी वसूल केल्याच्या कारवाईचा दिखावा करणे आदी करण्यात आले आहे. गमावलेल्या रकमेची वसुली करणे आवश्यक असल्याचे मत खंडपीठाने नोंदविले आहे. 

शासनाने गौणखनिज चोरीसंबंधी पुढाकार घेणे गरजेचे आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय असे कृत्य होत नाही. महसूल अधिकाऱ्यांचा सहभाग यात स्पष्टपणे दिसत असल्याचा निष्कर्ष खंडपीठाने काढला. राज्याने आपली संपत्ती गौणखनिज चोरी प्रकरणात गमावली असल्याने प्रशासनाने याविरोधात कारवाई करावी. गौणखनिजाचे जास्तीचे उत्खनन ज्या कंपन्यांनी केले त्यांचा दंड सहाशे कोटींवर गेल्याचे दिसून आले. अशा स्वरूपाचा दंड संबंधितांना द्यावा लागेल. प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा असल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे. यामध्ये सहभागी असलेल्यांची नावे समोर आल्यास भविष्यात खंडपीठ त्यांच्याविरोधात कारवाई करील, असेही स्पष्ट केले. याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. गिरीश नाईक थिगळे, अ‍ॅड. तथागत कांबळे व अ‍ॅड. सुश्मिता दौंड यांनी बाजू मांडली. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठMining Scamखाण घोटाळाAurangabadऔरंगाबाद