शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
2
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
3
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
4
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
5
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
6
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
7
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
8
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
9
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
10
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
11
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
12
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
14
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
15
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
16
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
17
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
18
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
19
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
20
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी

कुलगुरूंच्या भेटीचा धडाका सुरूच; ‘मशिप्र’ मंडळाच्या विधि महाविद्यालयात सामूहिक कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:34 IST

दोनही हॉलमधील ५३ विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे कुलगुरूंचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी परीक्षा केंद्रांना अचानक भेटींचा धडाका सुरूच ठेवलेला आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बीड शहरातील स्वातंत्र्यसेनानी रामराव अवरगावकर विधि महाविद्यालयाच्या दोन हॉलमध्ये ‘मास कॉपी’ आढळली. या दोनही हॉलमधील ५३ विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा २९ एप्रिल तर ६ मेपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. कुलगुरूंनी पदव्युत्तर परीक्षेत २९ एप्रिल रोजीच बीड शहरातील तीन परीक्षा केंद्रांना भेट दिली होती. त्यात बलभीम महाविद्यालय १५, केएसके महाविद्यालयात १५ आणि आदित्य व्यवस्थापनशास्त्रमध्ये ६ विद्यार्थी पकडण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात कुलगुरूंनी बीड येथील स्वातंत्र्यसेनानी रामराव पाटील विधि महाविद्यालयास बुधवारी भेट दिली. ‘मास कॉपी’ आढळून आल्यामुळे ५३ विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिका जमा करून घेण्यात आल्या. तसेच तीन मोबाईलही जप्त करून केंद्र संचालकांकडे सोपविले. कुलगुरूंच्या पथकात डॉ. प्रवीण यन्नावर, डॉ. भास्कर साठे व प्रा. सचिन भुसारी यांचा समावेश होता.

२१ मे रोजी कुलगुरूंच्या भेटीकुलगुरू डॉ. फुलारी यांनी बुधवारी सकाळच्या सत्रात धाराशिव जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. त्यात के. टी. पाटील फार्मसी महाविद्यालयात २ आणि आर. पी. विधि महाविद्यालयात ४ विद्यार्थी कॉपी करताना पकडले. त्याच वेळी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय व के. टी. पाटील एमबीए महाविद्यालयात विद्यार्थी कॉपी करताना आढळले नाहीत. दुपारच्या सत्रात बीड शहरातील अवरगावकर विधि महाविद्यालयात ५३ विद्यार्थी ‘मास कॉपी’ करताना पकडले.

२० मे रोजीच्या भेटीकुलगुरूंच्या पथकाने मंगळवारी छत्रपती संभाजीनगरातील सिद्धार्थ ग्रंथालयशास्त्र महाविद्यालय, पडेगावमध्ये ७ विद्यार्थी कॉपी करताना पकडले. त्याशिवाय दोघांकडे मोबाईलही सापडले. वसंतराव नाईक महाविद्यालयातील हॉलमध्ये प्रचंड अस्वच्छता, ‘मास कॉपी’सह तीन विद्यार्थी पकडले. दुपारच्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयात १ विद्यार्थी कॉपी करताना पकडला. पितांबरे महाविद्यालय, पडेगावमध्ये एकही कॉपीबहाद्दर आढळला नाही.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र