शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पेपरला नियोजनाचा फज्जा उडाला; एका बेंचवर तिघांना बसून परीक्षा देण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 13:20 IST

. ऐनवेळी क्षमतेपेक्षा अधिक परीक्षार्थ्याना शहरातील काबरा महाविद्यालय हे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने उडाला गोंधळ

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षांना बुधवारपासून सुरुवात झाली. मात्र, विद्यापीठाचे विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन पूर्णतः ढेपाळले असल्याचे आज सकाळच्या सत्रातील पेपर दरम्यान उघडकीस आले. ऐनवेळी क्षमतेपेक्षा अधिक परीक्षार्थ्याना शहरातील काबरा महाविद्यालय हे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने एका बेंचवर दोन किंवा तीन परीक्षार्थी बसून पेपर देत असल्याचे चित्र दिसून आले.   

कोरोना संसर्ग कमी झाल्याने यावर्षीपासून परीक्षा ऑफलाइन घेण्यात येत आहे. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यावर विद्यार्थी पहिल्यांदाच लेखी परीक्षेला सामोरे जात आहेत. विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा बुधवारी सुरू झाल्या. पहिल्या दिवशी बॅकलाॅग विद्यार्थ्यांचा पेपर होता. तर आज नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. बॅकलाॅगचे विद्यार्थी असल्याने परीक्षा केंद्रांवर विद्यार्थीसंख्या कमी होती. यामुळे सर्वकाही सुरळीत झाले. मात्र, आज नियमित पेपरसाठी शहरातील काबरा महाविद्यालयात तब्बल २०० विद्यार्थी अतिरिक्त ठरले. महाविद्यालयात ६०० विद्यार्थांच्या बैठकीची क्षमता आहे. काल येथे ४३६ विद्यार्थ्यांनी पेपर दिला. तर आज अधिकचे ७०० विद्यार्थी येथे आले. त्यामुळे महाविद्यालयाची बैठक व्यवस्था अपुरी पडली. महाविद्यालयाने वेळेचे महत्व ओळखून एका बेंचवर तीन विद्यार्थी बसवले.  तसेच उपलब्ध जागेत खुर्च्या, टेबल टाकून बैठक व्यवस्था केली. 

सकाळी ९ वाजताचा पेपर दीडतास उशिरा सुरु आज बीएस्सी संगणक शास्त्र, आयटी आणि बायोटेक चा पहिला पेपर होता. सकाळी नऊ वाजता सुरु होणारा पेपर विद्यार्थी संख्या अचानक वाढल्याने साडेदहा वाजता सुरु झाला. यावेळी एका बेंचवर तीनजण बसून पेपर देत होते. तर दोनशे विद्यार्थ्यांचे क्रमांक या केंद्रावर आढळून आले नाहीत. त्यांचीही परीक्षा विद्यापीठाच्या सुचनेनुसार येथेच घेण्यात येत आहे. काबरा महाविद्यालयात बैठक व्यवस्थेचा गोंधळ पाहून परीक्षा मंडळाचे एक पथक येथे दाखल झाले आहे.       

ऐनवेळी जास्त विद्यार्थी आले महाविद्यालयाची क्षमता विद्यापीठाला कळविण्यात आली आहे. मात्र, आज सकाळी पहिल्या पेपरला ऐनवेळी अतिरिक्त विद्यार्थी केंद्रावर आले. जवळपास २०० विद्यार्थी अतिरिक्त आहेत. - डॉ. सतीश सुराणा, प्राचार्य 

चौकशी करू या केंद्रावर अतिरिक्त विद्यार्थी कसे आले याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक गणेश मंझा यांनी हा सर्व गोंधळ पाहून दिली. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद