शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

गणवेशाचा निधी उचलण्यापूर्वीच गेला परत; पुरवठादारांची बिले कशी देणार, मुख्याध्यापक चिंतेत

By विजय सरवदे | Updated: August 31, 2023 19:40 IST

समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत दिले जातात.

छत्रपती संभाजीनगर : मोफत गणवेश वाटप योजनेद्वारे जिल्हा परिषद शाळांतील मुलांना १४ ऑगस्टपूर्वीच दुसऱ्या टप्प्यातील गणवेश वाटप करण्यात आले. दरम्यान, गणवेशाचा दिलेला हा निधीच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने परत घेतल्यामुळे पुरवठादारांची बिले अदा कशी करावीत, असा प्रश्न मुख्याध्यापकांना सतावत आहे.

समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत दिले जातात. प्रति विद्यार्थी प्रति गणवेश ३०० रुपयांचा निधी दिला जातो. यंदा २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पहिला गणवेश वाटप केला. त्यानंतर दुसरा गणवेश हा १४ ऑगस्ट अगोदर स्काऊट गाईडसाठी आवश्यक मुला-मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि मुलांसाठी गडद निळ्या रंगाची पँट आणि मुलींसाठी गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा सलवार देण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार शालेय व्यवस्थापन समित्यांनी पुरवठादार निश्चित करून गणवेश वाटप केले. जिल्ह्यातील २ लाख ९ हजार विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले असून यापैकी ७० हजार गणवेशांची बिले अदा झाली आहेत. यामध्ये कन्नड आणि पैठण तालुक्यातील शाळांना थोडाफार निधी वाटप झाला आहे. मात्र, उर्वरित ७ तालुके निधीपासून वंचित राहिले आहेत.

दरम्यान, शिक्षणाधिकारी कार्यालयातील समग्र शिक्षा अभियानास राज्यस्तरावरून प्राप्त झालेला ४ कोटी ३३ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा निधी पंचायत समित्यांमधील त्यांच्या कार्यालयाकडे हस्तांतरित केला होता. शाळांनी गणवेशाचे वाटप केल्यानंतर बिले सादर केली. मात्र, यापैकी ३ कोटी ८३ लाख ३२ हजार २०० रुपयांचा निधी समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्पाने काढून घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्याध्यापकांची भंबेरी उडाली. पुरवठादारांनी तर बिलांसाठी तगादा लावला आहे. आता त्यांची समजूत काढावी कशी, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.

निधी मिळेल, काळजी नसावीयासंदर्भात ‘लोकमत’ने जिल्हा समग्र शिक्षा अभियान कार्यालयाशी संपर्क साधला असता, शासनस्तरावर या निधीची पुनर्रचना केली जात असल्यामुळे तो परत गेला आहे. चार-आठ दिवसांत तो परत येईल. निधी वितरणाची प्रक्रिया बंद झालेली नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांनी संभ्रमात पडण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले.

३ कोटी ८३ लाखांची रक्कम गेली परततालुका - एकूण निधी - वाटप निधी - परत गेलेला निधीऔरंगाबाद - ६१६१७००- ००- ६१६१७००फुलंब्री- २७८०१००- ००- २७८०१००सिल्लोड- ५४६९७००- ००- ५४६९७००सोयगाव- २४९४२००- ००- २४९४२००खुलताबाद- २१८८२००- ००- २१८८२००गंगापूर- ५८९८३००- ००- ५८९८३००वैजापूर- ६०१११००- ००- ६०१११००पैठण- ६०९२१००- ४९८९३००- ११०२८००कन्नड- ६४०४१००- ७८०००- ६३२६१००

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzp schoolजिल्हा परिषद शाळा