शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

विशेष मुलांच्या हातांनी विणलेला प्रेमाचा धागा परदेशात पोहचला; पैश्यांसह मिळाला आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:02 IST

विशेष मुलांनी बनविल्या राख्या : प्रत्येक विकलेल्या राखीसोबत त्यांना केवळ मोबदला नव्हे, तर ‘मीही काही तरी करू शकतो’ हा आत्मविश्वास मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर : रक्षाबंधन प्रेमाचा, नात्यांचा आणि आपुलकीचा सण. यंदा शहरातील काही विशेष हातांमुळे. स्वमग्न, गतिमंद आणि विशेष मुलांनी बनविलेल्या राख्या राज्यातच नव्हे, तर देशाबाहेर आयर्लंड, स्वीडनमध्येदेखील गेल्या. आरंभ, नवजीवन, स्वयंसिद्ध या संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलांनी रंगीबेरंगी कल्पनांनी हजारो राख्या तयार केल्या. प्रत्येक राखी ही धागा नाही, तर त्या मुलांच्या मनातील स्वप्नांची गाठ आहे.

या शाळांमधील मुले रोजगाराचे, स्वावलंबनाचे धागे विणत आहेत. प्रत्येक विकलेल्या राखीसोबत त्यांना केवळ मोबदला नव्हे, तर ‘मीही काही तरी करू शकतो’ हा आत्मविश्वास मिळत आहे.

रक्षाबंधनाचा आरंभआरंभ शाळेतील विद्यार्थी २०१६ पासून वेगवेगळ्या प्रकारच्या सुबक वस्तू बनवतात. यावर्षी २५ मुलांनी दोन हजार राख्या, गिफ्ट हॅम्पर्सदेखील बनविले. ३ महिने आधीपासून या कामांना सुरुवात होते. मिळालेल्या पैशातून आपल्या आई, आजीसाठी त्यांना काही तरी घ्यायचे असते. संस्थेच्या अंबिका टाकळकर म्हणाल्या, मॉलमध्ये गेल्यावर एकदा साद नावाच्या विद्यार्थ्याने माझ्यासाठी एक ड्रेस निवडला. म्हणाला, "मॅडम, ये आपके लिये", हे ऐकून भरून आले. आपल्या विद्यार्थ्याने त्याच्या कमाईचा ड्रेस आपल्याला ऑफर करणे, यापेक्षा आनंददायी काय असू शकते ?

समाधान लाखमोलाचेनवजीवन संस्थेत १५० मुले आहेत. येथील मुलांनी एक हजार राख्या बनविल्या. ज्या राज्यासह राज्याबाहेरही पाठविण्यात आल्या. नाथ स्कूल ऑफ बिझनेसच्या विद्यार्थ्यांनी राख्या सर्वदूर पोहोचविण्यासाठी मदत केली. या कामासाठी मुलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. अभिजीत जोशी यांनी सांगितले की, संस्थेतली एक मुलगी तिच्या भाच्यांना ती मिळालेल्या पैशांमधून नवे कपडे घेऊन देते. यातून तिला मिळणारे समाधान लाखमोलाचे आहे.

मुलांमध्ये आत्मविश्वासस्वयंसिद्ध मतिमंद मुलांच्या शाळेत आतापर्यंत २५० राख्या बनविण्यात आल्या. विशेष म्हणजे यांच्या ५० राख्या आयर्लंड, स्वीडनला गेल्या. सध्या शाळेत ६० मुले असून, त्यातील ३० मुलांनी या राख्या बनविल्या. बाजारातील राख्या बघतांना या मुलांना आत्मविश्वास आला की आपणही अशाच राख्या बनवू शकतो. मुले घरी आनंदाने सांगतात की, आता मला पगार मिळणार आहे; असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRakhiराखी