शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दरवाजा तोडून चोरटे घरात शिरले; मुलास बेदम मारहाण करत दागिन्यांसह रोकड लुटली

By राम शिनगारे | Updated: April 18, 2023 20:01 IST

सुंदरवाडीतील घटना : चाेरीनंतर पाणी पिऊन चोरट्यांचा पोबारा

छत्रपती संभाजीनगर : भाजीपाला विक्रेत्याच्या घराचा दरवाजा तोडून चार चोरट्यांनी अल्पवयीन मुलास बेदम मारहाण करीत ४ तोळे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपये लुटून नेले. ही घटना सुंदरवाडीत मंगळवारी पहाटे ३.२२ वाजता घडली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक रविंद्र खांडेकर यांनी दिली.

भाजीपाला विक्रेते संतोष बद्रिनाथ निरगुडे (रा. श्रीकृष्णनगर, सुंदरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते पत्नी, मुलगा, मुलीसह राहतात. दररोजप्रमाणे सर्वांनी सोबत जेवण केल्यानंतर एका रुममध्ये पती, पत्नीसह मुलगी झोपली. समोरच्या खोलीत मुलगा शुभम हा झोपाला होता. पहाटे तीन वाजेच्या सुमारास चार चोरट्यांनी घरात प्रवेश करीत शुभमला लोखंडी गज, टांबी, कुऱ्हाड, चाकूने मारहाण सुरू केली. तेव्हा शुभमच्या मोठमोठ्याने ओरडण्याच्या आवाजाने आतमधल्या खोलीत झोपलेले त्याचे आई-वडिलसांसह उठले. दरवाजा उघडून पाहिल्यानंतर शुभमला धरून चौघेजण मारहाण करीत होते. संतोष यांनी चौघांना तुम्हाला काय पाहिजे, अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी तुमच्याकडे जे काही सोन्याचे दागिने, पैसे आहेत ते काढून देण्याच्या सूचना केल्या.

तसेच संतोष यांच्या पत्नी व मुलीच्या कानातील, अंगावरील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. ते निघत नसल्याचे दिसताच त्यांनी दोघींना दागिने काढण्यास भाग पाडले. एकुण ४ तोळे ३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख ५० हजार रुपये चोरट्यांनी घेतले. त्यानंतर एकजण किचनमध्ये गेला. त्याने फ्रिज उघडून त्यातील पाण्याची बॉटल घेतली. चौघांनी पाणी पिल्यानंतर घरातुन पोबरा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अधिक तपास उपनिरीक्षक बालाजी ढगारे करीत आहेत.

दोन मोबाईल बेसीनमध्ये टाकलेचोरट्यांनी निघताना घरातील दोन मोबाईल उचलून घेतले. जाताना ते मोबाईल किचनमधील समाेरच्या भागातील बेसीनमध्ये टाकले. त्यावर पाण्याचा नळ सुरू करून सर्वजण पळून गेले. दरम्यान, हे चोरटे घराच्या समाेरील भागात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद