शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

फुलंब्रीतील गट १७ मधील बोगसगिरी प्रकरणी तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:52 IST

फुलंब्रीतील गट १७ मधील प्रकरणावर विधानसभेत लक्षवेधी; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कठोर कारवाई

फुलंब्री : येथील गट १७ मधील एनएच्या प्रकरणात आमदार अनुराधा चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात सगळेच बोगस काम झाल्याचे सांगत तत्कालीन मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल व तलाठी भरत दुतोंडे यांना निलंबित करून दोघांची विभागीय चौकशी करण्याची घोषणा केली.

फुलंब्री येथील गट १७ व गट १७ ए मध्ये बांधकाम व्यावसायिकाने एकर क्षेत्र जमिनीचा एनए करून १५७ लोकांना प्लॉट विक्री केले होते. पण त्याची नोंद नगर पंचायतमध्ये होत नव्हती. या जमिनीचा झालेला एनए हा बोगस असल्याचे कारण देऊन एप्रिल २०२५ मध्ये फुलंब्री पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्लॉट धारक यांनी या संदर्भात आमदार अनुराधा चव्हाण यांनी भेट घेऊन अडचणी मांडल्या.           दरम्यान, या प्लॉट धारकांना न्याय मिळावा यासाठी आमदार चव्हाण यांनी ९ जुले रोजी विधानसभेत लक्षवेधी मांडली. शहरातील गट १७ मध्येची फोड करून १७ ए अस्तित्वात आणला. त्यानंतर बोगस एनए व सातबारा तयार करण्यात आला. घर व प्लॉट देण्याचे स्वप्न दाखवून खाजगी बांधकाम व्यावसायिक व दलालांच्या माध्यामातून अनेक कुटुंबाची घर घेण्याचे स्वप्न उध्वस्त झाले. २०१७ ते २०२५ मधील कालावधील झालेल्या दस्त नोंदणीची व यात सहभागी अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार अनुराधा चव्हाण यांनी केली.  सगळेच फ्रॉड: चंद्रशेखर बावनकुळे फुलंब्री येथील गट १७ मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश नसताना गटांची फोड केली.  त्यानंतर चुकीचा एनए करून बनावट नकाशा तयार केला. तसेच नगर रचना विभागाचे खोटे शिक्के बनविले. या प्रकरणात सर्वच बोगस आहे,  अशी कबुली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच तत्कालीन मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल व तलाठी भरत दुतोंडे यांना निलंबित करण्याची घोषणा करत त्यांची विभागीय चौकशी केली जाईल असे जाहीर केले. पण १५७ प्लॉट धारकांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतलं जाईल असे ही त्यांनी सांगितल्याने प्लॉटधारकांना दिलासा मिळाला आहे

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRevenue Departmentमहसूल विभाग