शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बापच निघाला नराधम; पोटच्या तीन वर्षाच्या मुलीवर केला अत्याचार

By सुमित डोळे | Updated: October 20, 2023 12:03 IST

तीन विषयांमध्ये पदवी, इंग्रजी शाळेत शिक्षक

छत्रपती संभाजीनगर : तीन विषयांमध्ये पदवीचे शिक्षण, इंग्रजी शाळेत शिक्षक तरीही पोटच्या तीन वर्षाच्या मुलीवरच शिक्षकाने अत्याचार केला. मुलीला लघुशंका करताना वेदना सुरू झाल्यानंतर विचारपूस केल्यानंतर आई थेट ठाण्यात गेली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत ३५ वर्षांच्या वडिलांना अटक केली.

बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९ ते १२ ऑक्टोबरदरम्यान ही संतापजनक घटना घडली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवड्याभरापूर्वी तीन वर्षांची मुलगी घरात अचानक रडायला लागली. आईने जवळ घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न केला असता लघुशंका करताना रक्तस्राव होत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने तत्काळ डॉक्टरांकडे घेऊन गेली असता काहीशा जखमा आढळून आल्या. आईने तिला विचारण्याचा प्रयत्न केला असता तिने इशाऱ्याद्वारे वडिलांविषयी माहिती दिली.

आईला मागील काही दिवसांमध्ये पतीच्या वागण्यात संशय आल्याने त्यानेच मुलीवर अत्याचार केल्याचा दाट संशय आला. त्यानंतर आईने तत्काळ बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेतली. सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे यांनी तक्रार दाखल करून वडिलांवर बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर अटक केली. न्यायालयाने त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मुलगी लहान असून बाल समितीसमोर तिचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत आहोत. विविध अंगांनी तपास सुरू असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे तपास अधिकारी घुगे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद