शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ घोटाळ्याचे लोण मराठवाड्यात? ‘एसआयटी’साठी फाइलींवरची धूळ झटकण्यास सुरुवात

By राम शिनगारे | Updated: December 17, 2025 14:53 IST

शालेय शिक्षण विभागात शालार्थ घोटाळा गत अनेक महिन्यांपासून गाजत आहे. नागपूर विभागातील घोटाळ्यात शिक्षण विभागातील अनेक मातब्बर अधिकाऱ्यांसह संस्थाचालकांनी कारागृहात जावे लागले.

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात गाजत असलेल्या शालार्थ घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर असल्याची चर्चा होत आहे. नागपूरनंतर नाशिक विभागात मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) मराठवाड्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. छत्रपती संभाजीनगर उपसंचालक कार्यालयासह विभागातील पाचही जिल्ह्यांतील शिक्षणाधिकाऱ्यांना २०१२ ते २०२४ या कालावधीतील वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडीच्या फाइल चौकशीसाठी तयार ठेवण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह इतरांच्या सेवा अधिगृहित करून फाइलींवरील धूळ झटकण्यास सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शालेय शिक्षण विभागात शालार्थ घोटाळा गत अनेक महिन्यांपासून गाजत आहे. नागपूर विभागातील घोटाळ्यात शिक्षण विभागातील अनेक मातब्बर अधिकाऱ्यांसह संस्थाचालकांनी कारागृहात जावे लागले. त्यानंतर नाशिक विभागातही घोटाळ्याची व्याप्ती वाढली. त्याच वेळी राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी ‘एसआयटी’च्या चाैकशीसाठी मराठवाड्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी दिल्याच्या फाइल तयार ठेवण्याचे आदेश आले आहेत. २०१२-१९ आणि २०१९-२४ या कालखंडातील फाइलचा शोध घेण्यात येत आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगरच्या शालेय शिक्षण विभागाने वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीच्या फाइलवरील धूळ झटकण्यासाठी अतिरिक्त ठरलेले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. त्याशिवाय काही सेवाही अधिगृहित केल्यात. सापडलेल्या फाइलही तत्काळ स्कॅन केल्या जात असून, या फाइल स्कॅन करण्यासाठी अत्याधुनिक स्कॅनरही मागविल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातून देण्यात आली.

तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱ्यांना देणार नोटीससन २०१२ ते २०२४ या कालखंडातील वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीच्या फाइली शोधण्यास सुरुवात झाली आहे. ज्या कालखंडातील फाइल सापडणार नाहीत. त्या कालावधीतील कार्यालय प्रमुख, प्रशासन अधिकारी आणि संबंधित टेबलचा लिपिकांना फाइलीच्या शोधासाठी नोटीस देण्यात येतील. तसेच त्या संपूर्ण फाइलची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला मिळाल्या आहेत.

कर्मचारीच शिक्षक बनलेल्याची स्वतंत्र यादीछत्रपती संभाजीनगर विभागात शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘हेराफेरी’ झाल्याची चर्चा आहे. त्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती केल्याची प्रकरणेच सर्वाधिक असल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांची स्वतंत्र यादी बनविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

अनुदानितवरच्या बदल्यांची चौकशीअनेक शिक्षण संस्थांमध्ये विनाअनुदानितवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती दाखविली आहे. या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बदली अनुदानितवर केल्याची शेकडो प्रकरणे समोर आली आहेत. त्याची संख्याही समोर येणार असून, तशा पद्धतीची माहिती उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचनाही शालेय शिक्षण विभागाला मिळाल्या आहेत.

उपसंचालक कार्यालयाकडून ४ हजार ७५ वैयक्तिक मान्यताशिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून विभागातील जिल्ह्यातील उच्च माध्यमिकच्या तब्बल ४ हजार ७५ वैयक्तिक मान्यता दिल्या आहेत. त्या फाइलीसह शालार्थ आयडीच्या फाइलीही जतन करण्यात येत आहेत. त्याशिवाय प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी दिल्याचा आकडा जमविण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shalarth Scam Spreads to Marathwada; SIT Begins File Review

Web Summary : The Shalarth scam, after Nagpur and Nashik, now focuses on Marathwada. Authorities are reviewing files from 2012-2024 related to teacher approvals and Shalarth IDs across five districts. Irregularities in teacher appointments and unauthorized transfers are also under scrutiny.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfraudधोकेबाजीEducation Sectorशिक्षण क्षेत्रCrime Newsगुन्हेगारी